१. आश्रमातील ध्यानमंदिरात जप करतांना स्वप्न पडणे आणि स्वप्नात एका डोंगरावर साधना करणार्या व्यक्तीची ‘वृक्षासन मुद्रे’त असणारी बाह्य आकृती दिसणे : ‘२४.१२.२०२० या दिवशी रात्री मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. त्या वेळी जप करतांना मला झोप (ग्लानी) आल्यासारखे झाले. मला झोपेत स्वप्न दिसले. त्यात मला दूर अंतरावर अनेक डोंगरांची रांग दिसली. त्यातील एका डोंगराच्या एका उंचवट्यावर मला एका मानवी देहाची बाह्याकृती दिसत होती. त्या वेळी ती आकृती ‘वृक्षासन मुद्रे’त (टीप) होती. एक साधना करणारी व्यक्तीच त्या मुद्रेत उभी राहून साधना करत होती; परंतु तिचा स्थूलदेह मला दिसत नव्हता. मला तिच्या देहाची बाह्य आकृती दिसली.
टीप – दोन्ही हात वर करून नमस्काराच्या मुद्रेत आणि डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवणे.
२. ‘राष्ट्रकार्य करण्यासाठी तेज देतो’, असा आवाज ऐकू येणे, ‘तो डोंगरावर दिसणार्या योगी व्यक्तीचा आहे’, असे जाणवणे आणि वातावरणात तेजतत्त्वाचा दैवी रंग पसरणे : त्या वेळी मला वातावरणात पिवळसर, नारिंगी आणि लाल हे रंग दिसत होते. हे रंग वातावरणात सर्वत्र पसरले होते. त्या वेळी माझ्या कानांत आवाज ऐकू आला, ‘राष्ट्रकार्य करण्यासाठी तेज देतो.’ तेव्हा ‘तो आवाज डोंगरावर दिसणार्या व्यक्तीचाच आहे’, असे मला जाणवले. ‘ती व्यक्ती, म्हणजे एक योगी आहे आणि त्या वेळी तो वातावरणात पसरलेला रंग म्हणजे तेजतत्त्वाचा रंग आहे’, असे मला जाणवले.
३. वरील दृश्य दिसल्यावर मला होणारा आध्यात्मिक त्रास घटला आणि मला त्या दृश्यातून दैवी ऊर्जा किंवा शक्ती प्राप्त झाल्याचे जाणवले.’
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०२२)
|