ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !

१. धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदू खोट्या कथानकांचे पीडित

‘व्यवसायाने मी एक अस्थीरोगतज्ञ आहे. पूर्वी मी नास्तिक होतो. वर्ष २०१३ नंतर मी सनातन धर्मासह जगातील सर्व धर्म-पंथांचा अभ्यास केला. केवळ १-२ वर्षांत मला समजले की, संपूर्ण जगात ‘सनातन धर्म’ हाच एकमात्र सत्य आहे आणि बाकी सर्व पंथ खोटे आहेत. याविषयी मी कुणाशीही शास्त्रार्थ करण्यास सिद्ध आहे. केवळ सनातन धर्म सत्य असतांनाही त्याविषयी खोटा प्रचार अधिक जोरात चालू आहे. आज ‘यू ट्यूब’, ‘फेसबुक’ इत्यादी सामाजिक माध्यमांवर अनेक लोक धर्माविषयी काहीतरी लिखाण (पोस्ट) प्रसारित करत असतात. या माहितीला कोणताही आधार नसतो, तरीही केवळ अज्ञानापोटी तो इतर हिंदू पुढे पाठवत असतात. त्यातून धर्माचा खोटा प्रसार होतो. यालाच खोटे कथानक रचणे (‘नॅरेटिव्ह’ पसरवणे) म्हणतात.

रावणाच्या सभेत (दरबारात) एक महोदरा राक्षस असतो. रावणावर रामाशी युद्ध करण्याची वेळ येते, तेव्हा महोदरा म्हणतो, ‘आपल्याला युद्ध करण्याची आवश्यकताच नाही. आपण काही लोकांना थोडे सोने आणि धन देऊ अन् असा प्रचार करू की, ‘राम-लक्ष्मणासह  सर्व वानरांना ठार मारण्यात आले आहे. हे सर्व जाऊन सीतेला सांगायचे. सीतामातेचा यावर विश्वास बसेल आणि ती तुमच्याशी विवाह करील. त्यामुळे तुम्हाला युद्ध करण्याची आवश्यकताच नाही.’ अशा प्रकारचा प्रचार सध्या चालू आहे. असे खोटे कथानक सनातनी लोकांविषयी ‘रामायण’ काळापासून चालत आले आहे.


डॉ. भास्कर राजू यांचा परिचय

डॉ. भास्कर राजू वी.

डॉ. भास्कर राजू हे अस्थीरोगतज्ञ असून भाग्यनगर, तेलंगाणा येथील ‘ धर्म मार्ग सेवा ट्रस्ट’चे विश्वस्त आहेत. ते प्रसारमाध्यमांतून हिंदु धर्मा वरील टीकेचे शास्त्राच्या आधारे खंडण करतात. त्यांनी ‘ऋग्वेद’ आणि ‘शुक्ल  यजुर्वेद’ या ग्रंथांचा तेलुगु भाषेत अनुवाद केला आहे. ते रामायणाचा भावार्थ इतरांना समजावून सांगतात, तसेच त्याचा ‘यू ट्यूब’वर प्रसारही करतात.

२. ख्रिस्ती, इस्लाम आणि साम्यवादी यांचे खोटे कथानक

सध्या सर्व सनातनी लोक बचावात्मक पद्धत अवलंबत आहेत. या जगात ख्रिस्ती, इस्लाम आणि साम्यवादी या ३ म्लेंच्छ (पाखंडी) विचारसरणी आहेत. या विचारसरणींचा हिंदूंना प्रतिवाद करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम त्यांना महत्त्व देणे टाळले पाहिजे आणि कथानक रचणे शिकले पाहिजे. ‘शुक्रनीती’ या ग्रंथातील काही श्लोकांमध्ये ‘म्लेंच्छ मत’ किंवा ‘यवन मत’ यांविषयी सांगितले आहे. तेथे शुक्राचार्य म्हणतात, ‘जे मत कलियुगात निर्माण झाले आहे, त्यांचा आधार ‘स्मृति’ आणि ‘श्रुति’ कधीच नाही. हे तीनही त्याचे आधार नाहीत. त्यामुळे ते ‘स्मृति’ आणि ‘श्रुति’ यांनाही मानत नाहीत. त्यामुळे ते आपल्यासाठी अस्पृश्यच आहेत. आपण त्यांच्यावर मोठे दोषारोप केले, तरच आपण त्यांच्याशी लढू शकणार आहोत. त्यांनी वार करायचा आणि हिंदूंनी बचाव करायचा. हा बचावात्मक खेळ अधिक दिवस चालणार नाही, ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे.

ते त्यांच्याकडे ॲडमपासून, नोवा, अब्राहम इत्यादींची उदाहरणे देतील. वास्तविक इतिहासामध्ये ॲडम आणि नोवा होऊन गेल्याचा काहीच पुरावा नाही. अब्राहम, मोझेस आणि डेव्हिड हेही कधी झाले नाहीत. जी पात्रे त्यांच्या ग्रंथात लिहिली आहेत, ती अस्तित्वातच नाहीत; कारण त्यांचा कधी जन्मच झाला नाही. त्यामुळे त्यांचे म्हणणे आपण मान्य करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

३. भारताला साम्यवादी विचारसरणीचा धोका !

साम्यवादी हे नास्तिक विचारसरणीचे असून सर्व देशद्रोही आहेत. त्यासाठी सर्व दूरचित्रवाहिन्यांचे सूत्रधार (निवेदक) फुटीरतावादी टोळीचे लोक आहेत. काही पक्षांचे साम्यवादी लोक राज्यघटना वाचवत असल्याचे सांगत फिरतात. ज्या साम्यवाद्यांनी चीनमध्ये १० कोटी आणि रशियात १२ कोटी लोकांना ठार मारले, ते भारताची राज्यघटना काय वाचवणार ? ते आपल्याला वाचवणार आणि आपण ते मान्य करावे, हे शक्य नाही. हे साम्यवादी मारेकरी असून देशद्रोही आहेत, हे सत्य सामाजिक माध्यमांतून लोकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यांनी अनेक देशांना नष्ट केले आहे. आता भारताची वेळ आहे. त्यामुळे आपल्या देशाला त्यांच्यापासून वाचवायचे आहे.

हे साम्यवादी सामाजिक माध्यमांमध्ये अधिक असून केवळ केरळमध्ये शिल्लक आहेत, तेथूनही त्यांना बाहेर पाठवायचे आहे. ‘या देशात आर्य बाहेरून आले आहेत’, असा प्रचार केला जातो, तर मग हे साम्यवादी आणि ख्रिस्ती हेही येथे जन्माला आले नाहीत, तेही बाहेरून आले आहेत. ते सनातन धर्मात जातीगत भेदभाव आहे, असा आरोप करतात. वास्तविक असे कोणत्याही ग्रंथात नाही. वेदांमध्ये शूद्र पार्श्वभूमी असलेले किमान ऋषी आहेत. वेदांमध्ये किमान ३० ब्राह्मण पंडित असे आहेत, जे शूद्र पार्श्वभूमी असलेले आहेत आणि स्त्रियाही ऋषिनी आहेत. त्यामुळे सनातन धर्मात भेदभाव नाही.

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

४. स्वत:हून शत्रूवर आक्रमण न करणे, हा हिंदूंचा मोठा दोष !

बायबलमध्ये त्यांचा भगवान सांगतो, ‘जो या ख्रिस्ती धर्मावर (पंथावर) विश्वास ठेवणार नाही, तो नरकात जाईल.’ मी बायबलच्या संदर्भात अनेक वेळा वादविवाद केला; परंतु आतापर्यंत कुणीही जिंकले नाही. सनातन हिंदु धर्मामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे; परंतु हिंदूंमध्ये एक मर्मस्थान (विक पाईंट) आहे. हिंदू कधीही स्वत:हून आक्रमण करत नाही. काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी लक्षावधी हिंदु पंडितांना ठार मारले आणि पळवून लावले. भारतावर इस्लामी आक्रमणे झाली, तेव्हाही कोट्यवधी सनातनी हिंदूंना ठार करण्यात आले, तरीही हिंदू दुसर्‍यावर स्वत:हून आक्रमण करण्याचा प्रयत्न करत नाही. ज्यांनी हिंदूंना ठार मारले, ते अजूनही आक्रमण करतच आहेत. त्यामुळे आता हिंदूंनीही आक्रमक पवित्रा अवलंबणे आवश्यक आहे, अन्यथा फार कठीण आहे.

५. हिंदूंनी स्वधर्माचा अभ्यास केल्यासच त्यांच्याकडून धर्मरक्षण शक्य !

आपण ख्रिस्ती किंवा अन्य पंथियांचा उल्लेख करतांना नेहमी ‘म्लेंच्छ’ किंवा ‘पाखंडी’ या शब्दांचा वापर केला पाहिजे. यालाच कथानक रचणे म्हणतात. हे पुराणे आणि उपनिषदे यांमध्ये सांगितले आहे. जेव्हा एखादा मुसलमान आपल्याला ‘काफीर’ म्हणतो; पण आपल्या ग्रंथानुसार ते ‘म्लेंच्छ’ म्हणजे पाखंडी आहेत. ख्रिस्ती प्रचारक सांगतात की, ते देवाविषयी बोलण्यास आले आहेत. आपले वेद, पुराण आणि उपनिषद यांमध्ये ज्या पद्धतीने भगवंताविषयी सांगितले आहे, तसेच जगात कुणीही बोलू शकत नाही, एवढे विस्तृत वर्णन केलेले आहे. या प्रचारकांकडे प्रचंड पैसे आहेत आणि आपल्याकडे लढण्यासाठी पैसे नाहीत.

जेव्हा आपण पािरभाषिक शब्दावली शिकून घेतली, तरच आपली लढाई आणखी बळकट होईल. आपण सर्व मिळून कार्य केले, तर सर्वकाही शक्य होईल. सर्व धर्म  एकसमान नाहीत. सनातन धर्म एकच सत्य असून अन्य सर्व धर्म खोटे आहेत. त्यामुळे हिंदूंनी आपल्या धर्मानुसार आचरण करावे, आपल्या धर्मग्रंथाचा अभ्यास करावा आणि  त्याचा प्रचार करावा. यात आपण अल्प पडतो. इतर पंथीय चुकीचे असतांनाही ते त्यांच्या पंथाचा जोरदारपणे प्रचार करतात. (ओरडून विकणार्‍याचे दगडमातीही विकली जाते आणि गप्प बसणार्‍याचे सोनेही विकले जात नाही.) आपल्या सनातन धर्मात सर्वकाही परिपूर्ण आहे, हे आपल्याला माहित आहे; परंतु आपण त्याचा प्रचार करत नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ग्रंथांचे वाचन केले पाहिजे, अन्यथा आपण दुसर्‍यांना पटवून देणे दूरच राहिले, त्याआधी आपलेच कुणीतरी धर्मांतर करून टाकेल.’

– डॉ. भास्कर राजू, अस्थीरोगतज्ञ तथा विश्वस्त, ‘धर्ममार्ग सेवा ट्रस्ट’ भाग्यनगर, तेलंगाणा.

संपादकीय भूमिका

पुरो(अधो)गामी, साम्यवादी आणि मुसलमान यांच्याकडून रचण्यात येणार्‍या कथानकांचा हिंदूंनी वैचारिक प्रतिवाद करणे महत्त्वाचे !