१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी जाण्यापूर्वी
अ. ‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी गोवा येथे जायला मिळणार आणि त्यांचे म्हणजे साक्षात् श्रीविष्णूचे दर्शन होणार’, हे ऐकूनच माझी पुष्कळ भावजागृती होत होती.
आ. मी जन्मोत्सवाशी संबंधित आणि अन्यही सेवा करत असतांना मला आतून आनंद जाणवत होता. माझ्या मनात अन्य कुठलेच विचार येत नव्हते.
इ. मला सभोवती केवळ गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) अस्तित्व सतत जाणवत होते.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी जातांना
अ. ११.५.२०२३ या दिवशी मी ब्रह्मोत्सवासाठी रत्नागिरीहून गोवा येथे जात होते. तेव्हा फर्मागुडीच्या आधी वळणावर मला गुरुदेवांचे अकस्मात् प्रत्यक्ष दर्शन झाले. तेव्हा मला काहीच सुचेना. ‘कसे करू ! आणि काय करू !’, अशी माझी अवस्था झाली.
आ. मला पुष्कळ भरून आले. मला ‘आता अन्य काही नको. मी धन्य धन्य झाले’, असे वाटू लागले.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहातांना
अ. प्रत्यक्ष ब्रह्मोत्सवाच्या वेळी माझ्या शरिरावर ऊन येत होते; पण त्याची झळ मला मुळीच लागत नव्हती. गार वार्याची झुळूक येऊन वातावरण थंड झाले होते.
आ. परात्पर गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रथातून माझ्या अगदी जवळून जात असतांना सनातनच्या या तीनही गुरूंची माझ्यावर कृपादृष्टी पडली. तेव्हा माझे मन निर्विचार झाले. माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू वहात होते.
४. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना
अ. महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहात असतांना ‘मी सत्ययुगात आहे’, असे मला जाणवत होते.
आ. ‘यागातून निघणारा धूर प्रत्यक्षात माझ्या शरिरावरून जात आहे आणि माझी अंतर्बाह्य शुद्धी होत आहे’, असे मला अनुभवायला येत होते.’
– सौ. शुभांगी मुळ्ये, रत्नागिरी (१६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |