डिचोली पोलिसांकडून २ जणांना अटक
डिचोली, ६ जून (वार्ता.) – डिचोली तालुक्यातील शिरगाव येथील मधलावाडा परिसरात ५ जूनच्या रात्री गोळीबार करत उपेंद्र चंद्रा गावकर (वय ६६ वर्षे) यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. यासंबंधी उपेंद्र गावकर यांनी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी प्रज्योत उपाख्य शिरीष लक्ष्मण गावकर आणि गिरीश लक्ष्मण गावकर या दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जूनच्या रात्री ८.३० च्या सुमारास शिरीष आणि गिरीश या दोघांनी उपेंद्र गावकर यांना दूरध्वनीवरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिरीष गावकर हा उपेंद्र गावकर यांच्या घरी गेला आणि त्याने उपेंद्र गावकर यांना शिव्या देत त्यांच्या दिशेने बंदूक रोखून गोळीबार केला; मात्र उपेंद्र गावकर तेथून पळून गेल्याने ते वाचले. शिरीष याने उपेंद्र गावकर यांच्या पत्नीवरही बंदूक रोखून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्या जिवाच्या भीतीने घराच्या मागील दारातून पळून गेल्या. त्यानंतर संशयिताने उपेंद्र गावकर यांचे चुलत भाऊ नागेश गावकर यांच्या घरातही अवैधपणे प्रवेश केला. शिरीष याने बंदुकीच्या धाकावर त्या परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन्ही संशयितांना ६ जून या दिवशी सकाळी सुमारे ९ वाजता अटक केली. या संशयितांवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमे, तसेच शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ७ आणि २५ अन्वये गुन्हे नोंद केले आहेत. यासंबंधी पोलिसांचे अन्वेषण चालू आहे.
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !