हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘नीतू मेहतानी स्मृती वाचनालया’मध्ये युवक-युवतींना मार्गदर्शन !

श्री. आनंद जाखोटिया

भोपाळ (मध्यप्रदेश) – एका संशोधनानुसार आपण दिवसभरात जे विचार विचार करतो, त्यापैकी ८० टक्के विचारांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. या विचारांमध्ये स्वतःची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे आपल्याला अनेक विचारांमधून ऊर्जा देणार्‍या एका विचाराकडे यावे लागते, ते म्हणजे नामजप. कुलदेवीचे नामस्मरण केल्याने आपल्या मनातील अनावश्यक विचार न्यून होतात, तसेच आपल्याला देवीचा आशीर्वादही मिळतो. एकाग्रतेने अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी नामजप लाभदायी ठरते, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी काढले. येथील ‘नीतू मेहतानी स्मृती वाचनालया’त ‘तणावमुक्त आणि यशस्वी जीवन’ या विषयावर ते युवक-युवतींना मार्गदर्शन करत होते. ग्रंथालयाचे सचिव श्री. कन्हैयालाल मोटवानी यांच्या प्रयत्नांमुळे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.