२ सप्टेंबरला खलिस्तानसाठी करणार जनमत संग्रह
ओटावा (कॅनडा) – कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील तमनविस माध्यमिक शाळेत २ सप्टेंबर या दिवशी सिख फॉर जस्टिस या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने बैठक आयोजित केली आहे. याद्वारे भारताची राजधानी नवी देहली येथे ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी होणार्या जी-२० परिषदेच्या बैठकीपूर्वी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या परिषदेत उपस्थित रहाणार्या राष्ट्रप्रमुखांना पत्र लिहिण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी या संघटनेने ३० जणांना दायित्व दिल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे. याच दिवशी येथे खलिस्तानसाठी जनमत संग्रहही करण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा १० सप्टेंबरला वँकुअर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. येथील एका गुरुद्वारामध्ये खलिस्तान समर्थकांना यासाठी बोलावण्यात आले आहे. येथेही खलिस्तानसाठी जनमत संग्रह केला जाणार आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार केवळ ब्रिटीश कोलंबियाच नव्हे, तर कॅनडातील अन्य राज्यांतही या काळात विविध आंदोलन करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
संपादकीय भूमिका
|