मेवातसारख्‍या दंगलींपासून रक्षणासाठी हिंदूंनी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घ्‍यावे ! – मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त), लेखक, प्रज्ञा मठ पब्‍लिकेशन

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘ऑनलाईन’ आयोजित विशेष संवाद : ‘मेवात कि मिनी पाकिस्‍तान ?’

मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त)

मुंबई – हरियाणातील मेवातमध्‍ये दंगल होण्‍यापूर्वी हिंसाचाराचे साहित्‍य, शस्‍त्रास्‍त्रे जमा होत होती, तेव्‍हा येथील पोलीस-प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही ? मेवातमध्‍ये पोलीस बंदोबस्‍त कुठे होता ? आज हिंदू नि:शस्‍त्र आहेत. शीख बांधवांना स्‍वतःचे रक्षण करण्‍यासाठी स्‍वतःजवळ ‘कृपाण’ (एक छोटा चाकू) बाळगण्‍याची अनुमती आहे. मेवातसारख्‍या दंगलीत स्‍वत:चे रक्षण करण्‍यासाठी हिंदूंनी शस्‍त्रांचे प्रशिक्षण घ्‍यायला हवे. हिंदूंनी भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍याची मागणी केली पाहिजे. हिंदु राष्‍ट्रात हिंदूंवर अत्‍याचार होणार नाहीत, धर्मांतराला बंदी असेल आणि सनातन हिंदु धर्माचे रक्षण केले जाईल, असे विधान ‘प्रज्ञा मठ पब्‍लिकेशन’चे लेखक आणि मेजर श्री. सरस त्रिपाठी (निवृत्त) यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मेवात कि मिनी पाकिस्‍तान ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

केंद्र सरकारने रोहिंग्‍यांना बंदीवास शिबिरांमध्‍ये ठेवून म्‍यानमारला पाठवावे ! – मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त)

श्री. सरस त्रिपाठी पुढे म्‍हणाले की, मेवातच्‍या दंगलीत रोहिंग्‍यांचा सहभाग होता. म्‍यानमारमधून पळवून लावल्‍यावर ते बांगलादेशमार्गे आले आणि त्‍यांना प्रथम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, देहली, काश्‍मीर, हरियाणा आदी वेगवेगळ्‍या ठिकाणी वसवण्‍यात आले आहे. त्‍यांना घर, पाणी, आधारकार्ड उपलब्‍ध करून दिले जात आहे. केंद्र सरकारने या रोहिंग्‍यांना बंदीवास शिबिरांमध्‍ये ठेवून म्‍यानमारला पाठवून दिले पाहिजे.

दंगलीत सहभागी सर्वांच्‍या घरांवर बुलडोझर चालवा ! – कृष्‍ण गुज्‍जर, हरियाणा प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल

कृष्‍ण गुज्‍जर

दंगलीची सिद्धता गेल्‍या एक मासापासून चालू होती. या दंगलीत रोहिंग्‍यांसह स्‍थानिक मुसलमानांचा सहभाग होता. मेवातमध्‍ये एकूण १०२ गावे हिंदूविहीन झाली आहेत. आता तेथे उरलेल्‍या हिंदूंनीही पलायन करावे का ? मेवातमध्‍ये काही ठिकाणी बुलडोझर चालवून हिंदूंना प्रसन्‍न करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जोपर्यंत दंगलीत सहभागी असलेल्‍या सर्वांच्‍या घरांवर बुलडोझर चालवला जात नाही, तोपर्यंत या दंगलीत हिंदूंची सुरक्षा करत बलीदान दिलेल्‍या बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या आत्‍म्‍याला शांती मिळणार नाही.

येणारा काळ हिंदूंसाठी कठीण आहे ! – सौ. पिंकी शर्मा, जिल्‍हा मातृशक्‍ती संयोजिका, विश्‍व हिंदु परिषद

सौ. पिंकी शर्मा

मेवातमध्‍ये आम्‍ही मंदिरात केवळ दर्शनासाठी गेलो असतांना हिंदूंवर आक्रमणे करण्‍यात आली. यामध्‍ये आक्रमणकर्त्‍यांनी लहान मुले, वुद्ध आणि महिला यांनाही सोडले नाही. हिंदूंचे मंदिरात जाणे आणि रामनाम घेणे धर्मांधांना सहन होत नाही; पण हिंदूंनी मात्र दिवसांतून ५ वेळा भोंग्‍यांद्वारे ‘अल्ला-हू-अकबर’च्‍या घोषणा ऐकायच्‍या ? येणारा काळ हिंदूंसाठी कठीण आहे. मेवातमध्‍ये हिंदूंच्‍या अत्‍यंत निर्घृणपणे हत्‍या करण्‍यात आल्‍या आहेत. सरकार हिंदूंची सुरक्षा करू शकत नाही. त्‍यामुळे हिंदूंनी ‘सेक्‍युलरवादा’तून (धर्मनिरपेक्षतेच्‍या वादातून) बाहेर येऊन आता जागृत झाले पाहिजे.