२ पोलीस अधिकारी आणि एक हवालदार निलंबित
नरसिंगपूर (मध्यप्रदेश) – येथे पोलिसांनी एका महिलेला गाडीच्या पुढच्या भागावर (बोनेटवर) अर्धा किमी फरफटत नेले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल अजमेरिया, उपनिरीक्षक संजय सूर्यवंशी आणि हवालदार नीरज देहरिया यांना तत्काळ निलंबित केले असून त्यांच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
Narsinghpur News : पुलिस के चलते वाहन पर लटकी महिला, दो एसआइ, एक आरक्षक निलंबित#NarsinghpurNews #MadhyapradeshNews #Campaignagainstdrugabusein #Gotegaon #Nayabazarhttps://t.co/NhoHoG6idH pic.twitter.com/JCMc2p1z2b
— NaiDunia (@Nai_Dunia) July 4, 2023
पोलीस अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणी एका आरोपीला घेऊन जात असतांना या आरोपीची आई पोलिसांची गाडी थांबवण्यासाठी पुढे आली; मात्र तिला पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. ती गाडीच्या समोरील भागावर चढल्यावर पोलिसांनी त्याच स्थितीत गाडी चालवून तिला पोलीस ठाण्यात आणले. या वेळी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता होती.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा करा ! |