कावड यात्रेच्या मार्गावरील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रशासनाला आदेश !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येत्या ४ जुलैपासून उत्तरप्रदेशात कावड यात्रेस प्रारंभ होत आहे. भाविक हरिद्वार येथे जाऊन गंगानदीचे पाणी हंड्यांमध्ये भरून ते कावडद्वारे आणून स्थानिक शिवमंदिरात जलाभिषेक करतात. शेकडो किलोमीटरची पायी यात्रा करून हे पाणी कावड यात्रेकरूंकडून आणले जाते.

या यात्रेच्या मार्गांची स्वच्छता करण्याचा, तेथे खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा, तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले आहेत.