बंगालमधील ‘हिंदु समाज पार्टी’कडून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला पत्र पाठवून विरोध
कोलकाता (बंगाल) – येथील हिंदु समाज पार्टीने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहिले आहे. त्यात अयोध्येतील श्रीराजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीरामाच्या मंदिराचे गर्भगृह आणि सिंहासन बनवण्याचे कंत्राट मुसलमानाला देण्यात आल्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. या न्यासाचे सदस्य महंत दिनेश दास यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे.
या पत्रामध्ये म्हटले आहे की, ‘न्यूज २४’ या वृत्तवाहिनीवर या संदर्भात वृत्त दाखवण्यात आले आहे. त्या मुसलमानांनी गोमांस खाणे सोडले आहे का ? ते पवित्रता आणि साधनसुचिता राखतील का ? ज्यांची श्रीरामावर श्रद्धा नाही, ज्यांच्यामुळे अयोध्येत भगवान श्रीराम यांना इतकी वर्षे वनवास भोगावा लागला, त्यांना गर्भगृह आणि सिंहासन यांच्या निर्मितीचे कार्य का देण्यात आले ? यातून ‘कुतूबमिनार आणि ताजमहाल मुसलमानांनी बांधले होते’, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? आदी प्रश्न या पत्रात उपस्थित करण्यात आले आहेत.

अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती