घरातून पैसे आणि दागिने घेऊन हिंदु तरुणी युसूफ नावाच्या सराईत गुन्हेगारसमवेत पळाली !

  • मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

  • युसूफ पीडितेला ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा कुटुंबियांचा आरोप !

प्रतिकात्मक चित्र

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे १९ वर्षीय हिंदु तरुणी घरातून पैसे आणि दागिने घेऊन  युसूफ नावाच्या सराईत गुन्हेगारासमवेत पळून गेली. युसूफपासून दूर रहाण्यासाठी मुलीला तिच्या कुटुंबियांनी समजावले होते. तिला ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपटही दाखवला होता. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह निश्‍चित केला होता. त्याआधीच ती दागिने आणि पैसे घेऊन युसूफसमवेत पळून गेली. या प्रकरणी तिच्या नातेवाइकांनी भोपाळमधील कमलानगर पोलीस ठाण्यात युसूफच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘युसूफ मुलीला ‘ब्लॅकमेल’ करत होता. काही दिवसांपासून ती अत्यंत नैराश्यात  होती. त्यामुळे तिने हे पाऊल उचलले असू शकते’, असे मुलीच्या नातेवाइकांनी तक्रारीत म्हटले आहे. युसूफने काही दिवसांपूर्वी या परिसरात रहाणार्‍या आणखी एका मुलीला त्याच्या वासनेची शिकार बनवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफवर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद आहेत. तो एक सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहाद्यांना कठोर शासन होत नसल्यानेच ते असे कृत्य करू धजावतात. हे पोलिसांना लज्जास्पद !