बांगलादेशमध्ये हिंदूंच्या नरसंहाराची चेतावणी !

बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित !

ढाका – मीरपूरमध्ये कट्टरपंथी जिहाद्यांनी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न नुकताच केला. त्यांनी हिंदूंच्या मंदिरांवर दगडफेक केली आणि हिंदुविरोधी घोषणा दिल्या, तसेच त्यांनी हिंदूंच्या नरसंहाराची चेतावणी दिली.

ढाका येथील इस्लामचा  अवमान करणार्‍या ‘फेसबूक स्टेटस’च्या आधारे जिहाद्यांनी हे आक्रमण केले होते; मात्र इस्लामचा अवमान करणारे फेसबूक स्टेटस एका मुसलमान व्यक्तीचेच असल्याचे नंतर समोर आले. (अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्‍या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे ! – संपादक)