मदरशातील मुलांप्रमाणे पोषाख घालून बिहारमधून  ५९ मुसलमान मुलांची तस्करी !

पोलिसांकडून मुलांची सुटका !

 मुसलमान मुलांची तस्करी

नाशिक – बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातून महाराष्ट्रात मुसलमान मुलांची तस्करी करणारे जाळे पोलिसांनी उघड केले आहे. तस्करी उघड होऊ नये, यासाठी या मुलांना मदरशातील वेश परिधान करून त्यांची तस्करी केली जात होती. या लहान मुलांना पुणे किंवा सांगली येथील मदरशांत नेण्याचे षड्यंत्र असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी चालू केली आहे. या ५९ मुलांची पोलिसांनी सुटका केली असून त्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. या प्रकारामुळे तस्करीचे मोठे जाळे उघड होणार आहे.


जळगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकांवर ही कारवाई करण्यात आली. दानापूर-पुणे एक्सप्रेसमध्ये ही मुले आढळून आली. या प्रकरणी ४ तस्करांना कह्यात घेण्यात आले आहे. तस्करांवर विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पूर्णिया जिल्ह्यातून सांगली येथे या मुलांची तस्करी होत आहे, अशी माहिती आरोपींनी चौकशीत दिली. कुणाला संशय येऊ नये; म्हणून मुलांना मदरशातील कपडे घालण्यात आले होते. २९ मुलांना जळगावला, तर मनमाड येथे सुटका झालेल्या ३० मुलांना नाशिक येथे पाठण्यात आले आहे.