आय.एस्.आय.च्या माजी प्रमुखाने घेतली होती ५०० कोटी रुपयांची लाच ! – माजी मंत्र्याचा आरोप

जनरल फैज हमीद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे मित्र असणारे आय.एस्.आय.चे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांनी ‘अल् कादीर ट्रस्ट’ घोटाळ्याच्या प्रकरणात ५०० कोटी रुपयांची लाच घेतली होती, असा आरोप माजी मंत्री फैजल वबडा आणि त्याचा मित्र यांनी केला. याच घोटाळ्याच्या प्रकरणी इम्रान खान यांना ९ मे या दिवशी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर पाकमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता.