शिक्षक नसल्याने १२९ शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण करणार्‍या उत्तरदायींना शिक्षा करा !

‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १२९ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत, तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये १-२ शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. यांमुळे जिल्ह्यात शाळांची परिस्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक शिक्षणशास्त्र (डी.एड्.) पदवीधारक उमेदवारांना नियुक्त्या द्या, अन्यथा १५ जूनला सर्व पालकांसह विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिली आहे.’ (२६.५.२०२३)