त्याने काय फरक पडतो ? हा प्रश्न स्वतःला विचारा !

वेदमूर्ती भूषण जोशी

१. प्रतिदिन अंघोळ करावी, असे कुठे आहे ? (तेही (मुसलमान) आठवड्यातून एकदाच अंघोळ करतात.)

२. स्नानानंतर कपाळावर टिळा लावावा, असे कुठे आहे ? (तेही (मुसलमान) लावत नाहीत.)

३. स्नान करून देवपूजा करावी, असे कुठे आहे ? (तेही (मुसलमान) देवपूजा निषिद्ध मानतात.)

४. एकाच ताटात किंवा एकमेकांचे उष्टे खाऊ नये, असे कुठे आहे ? (तेही (मुसलमान) असाच २० मिल्ला करतात, म्हणजेच एकाच ताटात एकमेकांचे उष्टे खरकटे खातात.)

५. गणपति, कृष्ण, यम आपल्या देवतांवर केलेली विडंबने, टुकार विनोद वा देवतांची हास्यमालिकांमधून केलेली टिंगल टवाळी पाहू नये. त्यावर मनसोक्त हसू नये, असे कुठे आहे ? (तेही (मुसलमान) हिंदूंच्या देवतांची यथेच्छ टिंगल टवाळी करून आनंद घेतात.)

६. संत-सज्जनांची टवाळी करू नये. धार्मिक संस्कार, यज्ञयाग, परंपरा यांची चेष्टा करू नये, असे कुठे आहे ? (तेही (मुसलमान) हिंदूंचे संत-सज्जन, परंपरा, धार्मिक संस्कार, यज्ञयाग यांची चेष्टा करतातच.)

७. मंदिरे, गड, प्राचीन वास्तू या सर्वांचे विद्रुपीकरण (स्वतःसह प्रेयसीचे नाव लिहिणे, मद्यपान करणे, अवशेष भग्न करणे, पावित्र्य नष्ट करणे) करू नये, असे कुठे आहे ? (त्यांनीही (मुसलमान) अनेक गड, मंदिरे भग्न केली. मूर्त्या विद्रुप केल्या आहेत.)

निधर्मी होण्याची वाटचाल

थोडक्यात काय, तर आपण हे सगळे करत आहोत आणि स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवत आहोत, तर आपण चुकीच्या मार्गावर आहोत, आपण केवळ ‘जन्महिंदु’ आहोत, जो स्वत:ची धार्मिक आणि राष्ट्रीय ओळख विसरलेला आहे. जो स्वत्व विसरतो, तो सर्वांत लवकर परधर्मीय होतो.

आपल्याला शाळा महाविद्यालयात आणि आजूबाजूला तथाकथित पुरोगामी आणि ‘सेक्युलर’ (निधर्मी) मंडळी असेच वागायला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शिकवतात. अनेक माध्यमांतून आपल्यावर हे बिंबवले जाते, हे विष न कळत आपला मेंदू बधीर करते आणि आपण ‘सेक्युलर’ होतो अन् नंतर आपसूक ते होण्याकडे आपली वाटचाल चालू झालेली असते.

हिंदी चित्रपटांच्या गाण्यांच्या माध्यमातून इस्लाम मान्य असल्याचे सांगणे

‘बॉबी’ हा हिंदी चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. त्यातील गाणी अनेकांनी ऐकली असतीलच. त्यात ‘मैं शायर तो नही’, असे एक प्रसिद्ध गीत आहे. या चित्रपटात नायक हिंदु, गीतकार, संगीतकार, गायक हे सर्व हिंदु आणि ज्या पात्राच्या तोंडात हे गाणे आहे तोही हिंदूच; पण एका कडव्यात ‘मैं काफिर तो नहीं । मगर ऐ हसीं, जब से देखा मैने तुझको मुझको बंदगी आ गयी’, असे वर्णन आहे. जो इस्लाम अथवा अल्लाला मानत नाही आणि जो मूर्तीपूजा करतो, त्याला ‘काफिर’ म्हणतात. जो अल्ला मानतो आणि जो इस्लामला मानतो, त्याला ‘बंदा’ म्हणतात.

गीतांमधील शब्दांचा हेतू आपण ओळखू शकत नाही, हे दुर्दैवीच !

‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे’, असे गाणे आपण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला म्हणतो. यातील हे राष्ट्र देवतांचे आहे, हे मान्यच आहे; पण कोणत्या अन्य पंथियांचे हे राष्ट्र आहे ? हे आपण कधी विचारतच नाही. अनेक देवीदेवतांचे अवतार, संत, दैवी लक्षणांनी युक्त सत्पुरुष इथे जन्मले. त्यामुळे हे राष्ट्र देवतांचे हे सयुक्तिक आहे;  ज्यांचा जन्म या भारतभूमीवरचा नाही, ज्यांचा भारताच्या सुवर्णकाळातील जडणघडणीत खारीचा वाटा नाही. त्यामुळे उगाच आपण त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना ‘हे राष्ट्र तुमचेही आहे’, असे का सांगायचे ? आधीच देशाचे धार्मिक आधारावर ३ लचके तोडून त्यांना (मुसलमानांना) दिले असतांनाही ‘उरलेले राष्ट्रही तुमचेच आहे’, हे आपण जाहीर सांगत आहोत. आपण गाणे ऐकतो, गुणगुणतो; पण त्यातली मेख आणि हेतू आपण ओळखू शकत नाही, हे दुर्दैव आहे.

त्यामुळे ‘त्याने काय होणार आहे ?’, हा प्रश्न स्वतःला विचारा !

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. (२१.५.२०२३)