सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘२२.५.२०२२ या दिवशी मी गोवा येथे असल्याने मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘रथोत्सव चालू झाल्यावर शंखनाद झाला. त्या वेळी मला तोंडात गोड चव जाणवली. अनुमाने २ मिनिटे मला जिभेवर गोडवा जाणवत होता.
२. सनातनचे तीन गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) विराजमान असलेला रथ नागेशी येथून रामनाथी आश्रमाकडे परत जातांना वाटेत मला २ श्वान दिसले. त्यांतील एक श्वान आतुरतेने कुणाची तरी वाट पहात असल्याप्रमाणे केवळ रथाकडे पहात होता. ‘त्या श्वानाकडे पाहून तो एक सात्त्विक जीव आहे’, असे मला जाणवले.
३. रथोत्सवानंतर त्यात सहभागी झालेल्या मडगाव येथील साधिका सौ. नीता सोलंकी यांच्याशी बोलतांना त्यांनी मला सांगितले, ‘‘मलाही त्या श्वानाकडे पाहून तो सात्त्विक जीव आहे’, असे जाणवले.’’
– श्री. गुरुराज प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४७ वर्षे), वाराणसी (२२.५.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |