पिंपरी – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सध्या चालू आहे. ‘शैक्षणिक संस्थांनी आर्.टी.ई. अंतर्गत प्रवेश घेतलेल्या पालकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये’, असा सरकारी आदेश असतांनाही शहरातील काही खासगी शिक्षण संस्था पालकांकडून शुल्क घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘आधी शुल्क भरा, राज्य सरकारकडून अनुदान आल्यावर तुमचे शुल्क परत देऊ’, असे सांगून पालकांकडून पैसे घेतले जात आहेत. या संदर्भात महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांकडे तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. यावर ‘शाळांनी घेतलेले शुल्क पालकांना तात्काळ परत करावे अन्यथा अन्वेषण करून संस्थांवर कारवाई करू. यासाठी अधिकार्यांना त्यांच्या कक्षेतील सर्व शाळांना आदेश निदर्शनास आणावेत’, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.