हिंदूंच्या उत्सवांमध्येच हिंसाचार का ?

हिंदूंच्या शोभायात्रा किंवा उत्सव यांच्या वेळी धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या दंगलीविषयी कथित निधर्मीवादी गप्प का बसतात ?

श्री. ललित गर्ग

१. सांप्रदायिक सौहार्दाचे वातावरण गढूळ करण्यासाठी हिंदूंच्या उत्सवांमध्ये हिंसाचार घडवण्याचे षड्यंत्र ! 

श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या वेळी देशाच्या विविध राज्यांमध्ये हिंसाचाराच्या ज्या बिभत्स आणि उन्मादक घटना समोर आल्या आहेत, त्या प्रश्न निर्माण करतात की, हिंदूंच्या सणांमध्येच हिंसाचार का माजवण्यात येतो ? हिंदु उत्सवांच्या निमित्ताने सांप्रदायिक सौहार्दाचे वातावरण गढूळ करण्यासाठी जाणूनबुजून षड्यंत्र करण्यात येते का ? हिंदु देवीदेवतांशी संबंधित श्रद्धांवरच आक्रमण का केले जाते ? संबंधित राज्य सरकारे आणि पोलीस प्रशासन अशा घटना थांबवण्यासाठी आधीपासूनच सतर्क का रहात नाहीत ? ते दोन समाजांमध्ये हिंसाचार घडण्याची वाट पहात असतात का ? प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही रामनवमीच्या दिवशी बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर बिहार होरपळला. बिहारचे नालंदा आणि सासाराम यांसह अन्य ठिकाणीही भीषण हिंसाचार झाला, जो थांबवण्यासाठी केंद्रीय अर्धसैनिक दल तैनात करावे लागले. अशा प्रकारच्या घटनांसाठी कुणाला उत्तरदायी ठरवायचे ? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो. हिंसाचाराच्या अशा घटनांवर राजकारण करणे आणि एकमेकांवर दोषारोप करणे, हा आपल्या देशात एक पायंडा पडला आहे; पण हे त्यांचे प्रशासकीय अपयश असल्याचे कोणतेही सरकार मान्य करण्यास सिद्ध नाही. समाज आणि राष्ट्र यांमध्ये संकीर्ण सांप्रदायिक व्यवस्था असून ती वाढत आहे, जी न्यायव्यवस्थेच्या आवाक्याबाहेर आहे. एका विशेष धर्मावर अन्याय होऊ नये आणि त्यांचे शोषण होऊ नये, असे सर्वांनाच वाटते; परंतु त्या विशेष धर्माने हिंसाचार अन् प्रक्षोभक वातावरण निर्माण केले, तर त्याचा प्रतिकार करणे आवश्यक आहे, तरच देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते.

२. देशाची एकता आणि अखंडता यांच्या दृष्टीने ममता बॅनर्जी यांचे अतिशय धोकादायक वक्तव्य

हिंदु श्रद्धांचा अवमान होत असतांना चूप रहायला सांगणारे सांप्रदायिक सौहार्द कसे असेल ? कालीदेवीला सिगारेट पितांना दाखवणार; पण कुणी काहीही बोलायचे नाही. भगवान शंकर आणि पार्वती यांचा अवमान करण्यात येईल; पण चूप रहायचे. हिंदु सणांवर होणार्‍या आक्रमणांवर शांत बसा. शेवटी सांप्रदायिक सौहार्दाच्या नावावर या देशात कोणता खेळ खेळण्यात येत आहे ? कधीपर्यंत हिंदु धर्मीय सहिष्णुता आणि धार्मिक सौहार्द यांच्यासाठी स्वत:चे बलीदान देत रहातील ? रामनवमी आणि त्याच्या दुसर्‍या दिवशीही बंगालमध्ये नमाजपठणानंतर हिंसाचाराच्या क्रूर घटना समोर आल्या. स्वतःचा दुबळेपणा लपवण्यासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘अनुमती नसतांना  मुसलमानबहुल भागांमधून शोभायात्रा काढण्यात आल्याने हिंसाचार भडकला.’’ मग मुसलमान भागातून शोभायात्रा काढणे, हा गुन्हा आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. ममता बॅनजी यांचा हा कसा विसंगत तक आहे ?

वष १९४७ मध्ये धमाच्या आधारावर झालेल्या फाळणीनंतर ममता बॅनजी यांना आता धमाच्या आधारावर भारताचे आंतरिक विभाजन करायचे आहे का ? ममता बॅनजी यांचे वक्तव्य देशाची एकता आणि अखंडता यांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. वास्तविकपणे पाहिले, तर बंगालमध्ये झालेल्या भीषण हिंसाचारासाठी ममता बॅनजी यांच्याच एका वक्तव्याला उत्तरदायी ठरवण्यात येत आहे. रामनवमीच्या एक दिवसापूवी त्यांनी म्हटले होते, ‘‘मी रामनवमीच्या शोभयात्रा थांबवणार नाही; पण शोभायात्रेच्या वेळी कोण्या मुसलमानाच्या घरावर आक्रमण करण्यात आले, तर मी सोडणार नाही.’’ त्यांनी असेही म्हणायला हवे होते, ‘या शोभायात्रेवर कुणी आक्रमण केले, तर त्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल.’

३. आतंकवादी जिहादी प्रवृत्तींकडून हिंदूंवर नियोजनपूवक आक्रमण !

केवळ बंगालच नाही, तर बिहार, राजस्थान आदी राज्यांमध्येही मुसलमानांच्या लांगूलचालनाचे राजकारण करण्यात येत आहे. कट्टरवादी समुदायाच्या हिंसक आणि उन्मादी घटनांना दाबण्यात येत आहे. त्यामुळे हिंदु सणांवर लागोपाठ आक्रमणे होत आहेत. हिंदु नववष, श्रीरामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी देशभर काढण्यात आलेल्या शोभायात्रांवर जिहादी आणि हिंसक प्रवृत्ती यांच्याकडून भीषण आक्रमण करण्यात आले. त्या हिंदु-मुसलमान दंगली नव्हत्या, तर आतंकवादी जिहादी प्रवृत्तींकडून नियोजनपूवक करण्यात आलेले पक्षीय आक्रमण होते. राजस्थानच्या करौली येथील आक्रमणामध्ये तेथील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि इतर जिहादी यांचा सहभाग दिसून आला. त्यांच्या विरोधात प्रसारमाध्यमे आणि जनता यांनी कारवाई करण्याची मागणी केली; पण त्यांच्यावर कारवाई करणे सोडून सरकार गुन्हेगारांचा बचाव करत आहे.

अन्यायाला तीव्र प्रत्युत्तर किंवा विरोध करणार्‍याचे सरकार आणि न्यायालय ऐकते. त्यामुळे जोपर्यंत बहुसंख्यांक हिंदू अशा आक्रमणांना योग्य प्रत्युत्तर देऊन विरोध करत नाहीत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत; पण असे प्रोत्साहन दिल्याने देशाची एकता आणि अखंडता खंडित होऊ शकते. हिंदु आणि अन्य समुदाय यांचे लोक मनुष्याला मनुष्याशी जोडण्यावर विश्वास ठेवतात; पण मुसलमान समाज असे करू शकत नाही. यातून  राजकीय स्वार्थ साधला जातो.

४. हिंदु श्रद्धास्थानांवर आक्रमण होत असतांना  पुरस्कारवापसी टोळीशी संबंधित लोक शांत का ?

हिंदु सणांची अहिंसक आणि सौहार्दपूर्ण संस्कृती धुळीस मिळवण्यासाठी राजकारणी, चित्रपट निर्माते, पत्रकार आदी मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहेत. ‘अंतरंगी रे’ या हिंदी चित्रपटाच्या अनेक दृश्यांमध्ये हिंदु देवीदेवता आणि धर्मग्रंथ यांचा अवमान करण्यात आला. एवढेच नाही, तर या चित्रपटामध्ये हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांचे प्रेम दाखवून ‘लव्ह जिहाद’लाही प्रोत्साहन देण्यात आले. ‘ब्रह्मास्र’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर जोडे घालून मंदिरातील घंटा वाजवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. अशा प्रकारे जाणूनबुजून हिंदूंशी संबंधित श्रद्धांना तुडवण्यात येत आहे, तसेच मंदिरे आणि देवीदेवता यांचा उघडपणे अवमान करण्यात येत आहे. यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, हे सर्व अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावावर करण्यात येत आहे. यामुळे हिंदु देवतांचा अवमान रास्त ठरवला जात आहे.

श्रीरामनवमीच्या दिवशी नियोजनपूर्वक भीषण हिंसाचार घडवण्यात आला. त्यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अनेक निरपराध लोक घायाळ झाले. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. विशेष म्हणजे या हिंसाचाराविषयी राजकीय पक्षांकडून पुळचट प्रतिक्रिया आल्या. लहानसहान घटनांवर घसा कोरडा करून आवाज उठवणारे उदारमतवादी, मानवाधिकारवादी, पुरस्कारवापसी टोळी, टुकडे-टुकडे टोळी यांच्याशी संबंधित लोक असे शांत आहेत, जसे देशात सर्व काही सुरळीत चालू आहे. असा हिंसाचार ईदच्या दिवशी झाला असता, तर हे सर्व जण कथित धर्मनिरपेक्षतेची चादर ओढून छाती पिटतांना दिसले असते आणि भारतापासून विदेशापर्यंत ‘भारतात लोकशाही धोक्यात आहे’, हा ध्वनी उमटतांना दिसला असता. त्यामुळे ‘या तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांसाठी हिंदू आणि हिंदूंचे रक्त एवढे स्वस्त का आहे ?’, असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.

५. आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी श्रीकृष्ण प्रकट होतो, यावर श्रद्धा ठेवा !

आज समाजाचे संपूर्ण स्वरूप पालटत आहे. सद्भाव आता केवळ उपदेश देण्यासाठी शेष राहिला आहे. आता जी परिस्थिती समोर येत आहे, ती स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आतल्या आत वाढत आहे. हा देश ज्या गोष्टींच्या आधारे सुरक्षित होता, त्यांना आपल्या नेत्यांचे मतांचे राजकारण आणि अनिष्ट तत्त्व यांनी उघड केले आहे, असे वाटते. येणार्‍या निवडणुकांमध्ये धर्मांधतेला उचल दिली जाईल. लोकांची भावना अशा मर्यादेपर्यंत तापवली जाईल, ज्यामुळे सत्तेसाठी लाभ होईल. जेव्हा जेव्हा अशा आसुरी शक्ती सक्रीय होतात, तेव्हा श्रीकृष्ण प्रकट होतो. धर्माविषयी ठामपणे श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत धर्माला अंधश्रद्धेपासून मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत वास्तविक धर्माचा जन्म होणार नाही. अन्यथा अंधश्रद्धेचा लाभ राजकारणी आणि आतंकवादी उठवत रहातील.’

– श्री. ललित गर्ग (साभार : पाक्षिक ‘हिंदु विश्व’, १ ते १५ मे २०२३)