गुरुदेवा, ‘कधी विसर न व्‍हावा’, हीच तुम्‍हा प्रार्थना ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री. सुधाकर जोशी

काळ चालला पुढे ।
गतायुष्‍याचा विचार करिता,
कोणी नसे रे तुझे ॥ १ ॥

पूर्वपुण्‍याई फळा आली।
झालो आश्रमवासी॥ २॥

नाही राहिली कशाचीही आस।
झालो परात्‍पर गुरुदेवांचा (टीप) दास॥ ३ ॥

माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, पुत्री, सगेसोयरे।
सर्व मायेचा बाजार ॥ ४ ॥

आता कुणी नको देवा ।
तुझ्‍या चरणी मिळू दे विसावा ॥ ५ ॥

दुःखातही सुख गवसले ।
रामनाम धन वेचले ॥ ६ ॥

देवा, दुःख सहन होत नाही ।
बोलव रे मला आता तुझ्‍याकडे ॥ ७ ॥

परात्‍पर गुरुदेवा, एक मागणे मागतो ।
तुमचा कधी विसर न व्‍हावा, हीच तुम्‍हा प्रार्थना ॥ ८ ॥

टीप – परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा

– श्री. सुधाकर जोशी (वय ९२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.६.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक