हत्येच्या मागे जिहादी असल्याचा विश्व हिंदु परिषदेला संशय !
देहली – दक्षिण देहलीतील संगम विहार क्षेत्रामध्ये अज्ञात आक्रमणकर्त्यांनी ३ गायींवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केल्याचे आढळून आले आहे. देहली पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या गायींवर पशूवैद्यकीय रुग्णालयात उपचार चालू असतांना एका गायीचा मृत्यू झाला. ही घटना १२ मेच्या सकाळची आहे.
दक्षिणी दिल्ली के संगम विहार में तेज धार दार हथियार से तीन गायों को एक ही तरीके से घायल कर रास्ते मे छोड़ देना हिन्दू समाज को चिढ़ाने जैसा है। घटना के दो दिन बाद भी @CMODelhi @DelhiPolice द्वारा कठोर कार्यवाई का अभाव समाज में असंतोष बढ़ा रहा है। pic.twitter.com/B2VCfRuNuj
— विनोद बंसल Vinod Bansal (@vinod_bansal) May 14, 2023
या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी ट्वीटद्वारे संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, धारदार शस्त्रांद्वारे तीन गायींना एकाच प्रकारे घायाळ करून रस्त्यावर सोडून देण्याचा हा प्रकार हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात देहली पोलीस आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. (केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या देहली पोलिसांनी या प्रकरणाचे त्वरित अन्वेषण करून संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असे हिंदूंना वाटते ! – संपादक) ‘ही घटना काही एकाएकी घडलेली नसून यामागे जिहाद्यांचे षड्यंत्र असल्याचे प्रतीत होत आहे’, असा आरोपही बंसल यांनी या वेळी केला.
संपादकीय भूमिकाहिंदूंसाठी पूजनीय असलेल्या गोमातेवर आक्रमण करणारे कोण असू शकतात, हे जगजाहीर आहे; परंतु बहुसंख्य हिंदूंच्या देशाच्या राजधानीत गोमाता असुरक्षित असणे, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ! |