सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांची आठवण काढून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या मृत्यूत्तर प्रवासातील अडथळे दूर करून त्यांचा प्रवास सुखकर केल्याचे जाणवणे

पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचा आज दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने …

१. संत पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांनी देहत्याग करण्यापूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांची आठवण काढणे आणि ते भावस्थितीत असल्याचे सांगणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘५.५.२०२३ या दिवशी रात्री उशिरा मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत सेवा करत होते. त्या वेळी सेवा चालू असतांना अकस्मात् श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांची आठवण काढली. खरेतर त्या वेळी त्यांचा कोणताच विषय नव्हता, तसेच माझाही त्यांच्याशी संपर्क नव्हता, तरीही बिंदाताई पू. आजोबांविषयी सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, ‘‘वर्ष २०२३ मध्ये मी २ वेळा सनातनच्या देवद आश्रमात गेले. दोन्ही वेळा माझी पू. देशपांडेआजोबा यांच्याशी भेट झाली. त्या वेळी ते शारीरीक त्रास अन् व्याधी यांमुळे पुष्कळ थकलेले होते. त्यामुळे ते मला म्हणाले, ‘‘आता मला लवकर निरोप द्या.’’ इतका त्रास होत असूनही ते भावस्थितीत होते. भेटीच्या वेळी त्यांच्या डोळ्यांमधून अखंड भावाश्रू येत होते.’’

२. पू. देशपांडेआजोबा यांनी देहत्याग केल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील काळाच्या पलीकडील जाणण्याच्या अफाट क्षमतेचे दर्शन होणे

सौ. प्रियांका राजहंस

त्यानंतर ७.५.२०२३ या दिवशी सकाळी पू. देशपांडेआजोबा यांनी देहत्याग केल्याचे मला समजले. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील काळाच्या पलीकडील जाणण्याच्या अफाट क्षमतेचे दर्शन घडले. ‘त्या विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी किती एकरूप आहेत’, हेही यातून लक्षात आले. संत असल्यामुळे जीवनमुक्तच असलेल्या ‘पू. आजोबांच्या मृत्यूत्तर पुढील लोकातील प्रवासात काही अडथळे असल्यास ते दूर व्हावेत अथवा त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठीच जणू श्रीसत्‌शक्ति बिंदाताईंनी त्यांची आठवण काढली’, असे मला वाटले. ताईंनी

पू. आजोबांची आठवण काढणे आणि दुसर्‍याच दिवशी त्यांनी देहत्याग करणे, यामागे सूक्ष्मरूपात घडलेली प्रक्रिया जाणण्यास आम्ही असमर्थ आहोत. ‘श्रीसत्‌शक्ति बिंदाताई म्हणजे सनातनमधील प्रत्येक संत, तसेच साधक यांच्याकडे अखंड लक्ष असलेली मायमाऊली आहे ! त्या साधकांसाठी साक्षात् गुरुस्वरूप आहेत ! प्रत्येकाचा उद्धार होईपर्यंत त्या अखंड कार्यरत रहाणारच आहेत’, याविषयी माझ्या मनात श्रद्धा निर्माण झाली.

समस्त मानवजातीला मोक्षाला नेणारे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव अन् त्यांच्यासम प्रत्येक जिवाच्या उद्धाराची तीव्र तळमळ असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– सौ. प्रियांका चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.५.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक