… तरच धार्मिक दंगली थांबतील !

अकोला येथील दंगल

अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. कुणी कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असेल, तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. प्रसारित केलेली पोस्ट वादग्रस्त असेल, तर ती प्रसारित करणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी; मात्र ती कारवाई कायद्यानुसार व्हावी. भावना मुसलमानांच्या असोत किंवा हिंदूंच्या कुणाला कायदा हातात घेण्याची अनुमती राज्यघटनेने दिलेली नाही. म.फि. हुसेन या मुसलमान चित्रकाराने हिंदूंच्या देवतांची अनेक नग्न चित्रे काढली. त्या वेळी ‘हुसेन मुसलमान आहे’ म्हणून हिंदूंनी सर्व मुसलमानांना दोषी धरून त्यांच्यावर आक्रमण केले नाही. हुसेन यांच्या विरोधात हिंदूंनी कायदेशीर पद्धतीने देशभरात विविध ठिकाणी १ सहस्रहून अधिक तक्रारी प्रविष्ट केल्या. हिंदूंच्या देवतांवर उपहासात्मक विनोद करणारा हास्यकलाकार मुनव्वर फारूकी असो, वा हिंदूंच्या देवतांना ‘वेश्या’ म्हणण्यापर्यंत अवमान उघडपणे करणारा झाकीर नाईक असो, ‘हे सर्व मुसलमान आहेत’ म्हणून हिंदूंनी कधीही दंगली घडवल्या नाहीत, ना त्यासाठी सर्व मुसलमान समाजाला दोषी धरले. हिंदूंनी नेहमीच कायदेशीर मार्गाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. मुसलमान मात्र कुणा हिंदूकडून त्यांची कथित धार्मिक भावना दुखावली गेली, तर विनाकारण सर्वसामान्य हिंदु समाजाला लक्ष्य करतात. हिंदूंच्या हत्या करतात आणि दंगली घडवतात. मुसलमानांच्या या दंगलखोरीला आवरण्यास पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते कुचकामी ठरत आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात वारंवार होत असलेल्या या दंगली या सर्वांच्या नाकर्तेपणाचा परिणाम होय.

अकोला येथील दंगलीचा हा काही पहिलाच प्रकार नाही. काही मासांपूर्वी अमरावती येथेही ‘धार्मिक भावना दुखावल्या’ म्हणून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. हिंदूंच्या दुकानांची जाळपोळ केली. म्यानमार येथे मुसलमानांवर अन्याय झाला; म्हणून वर्ष २०१२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी महाराष्ट्रातील आझाद मैदान येथे दंगल करून पोलिसांवरही आक्रमण केले होते. ही आहे त्यांची दंगलखोर वृत्ती ! येनकेन प्रकारेण कुठला तरी धार्मिक वाद उकरून काढायचा आणि हिंदूंना लक्ष्य करायचे, ही धर्मांध मुसलमानांची वृत्ती यातून लक्षात येते. यामध्ये मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे कुणीही समर्थन करून शकत नाही; मात्र त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. हे कारण पुढे करून धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवणे हे आक्षेपार्ह आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर ते कायदेशीर मार्ग अवलंबतात, मग मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखवल्यास त्यांना दंगल घडवण्याचा परवाना कुणी दिला ? उगाचच ‘धार्मिक भावना’ हा शब्द वापरून मुसलमानांचा हा दंगलखोरपणा पोलिसांनी खपवून घेऊ नये.

योगींचा आदर्श घ्यावा !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापूर्वी उत्तरप्रदेशमध्येही धर्मांध मुसलमान अशाच प्रकारे दंगली करत होते; मात्र दंगली घडवणार्‍यांकडून सरकारने हानीभरपाई वसूल करण्याची पद्धत अवलंबली. वसुली होण्यासाठी दंगलखोरांच्या मालमत्तेचा लिलाव करून हानीभरपाई वसूल केली जाते. दंगलखोरांना अशा प्रकारे पोलिसी खाक्या दाखवला जातो की, ते पुन्हा समाजात दंगल माजवण्याचे धारिष्ट्य करत नाहीत. ‘अल्पसंख्यांक आहेत, म्हणून मुसलमानांचे फाजील लाड चालणार नाहीत’, हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले. कुणाही मुसलमानावर तो ‘मुसलमान’ आहे म्हणून अन्याय होऊ नये; मात्र तो समाजकंटक असेल, तर ‘मुसलमान’ आहे म्हणून त्याला सोडूही नये. ही भूमिका स्पष्ट असेल, तर समाजकंटकांना शिक्षा करण्यामध्ये त्यांचा धर्म आड येणार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रातील पोलीस आणि प्रशासन ‘मुसलमान’ म्हटले की, कचखाऊ भूमिका घेतात. हे फाजील लाड बंद होतील, तेव्हाच या दंगली थांबतील. यासाठी योगी आदित्यनाथ यांचा आदर्श महाराष्ट्राच्या नेतृत्वाने घ्यायला हवा.

मुसलमानांच्या धार्मिक भावना आहेत, तशा त्या हिंदूंच्याही आहेत. मुसलमान मात्र त्यांच्या धार्मिक भावनांचा बागुलबुवा निर्माण करत आहेत. हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुका मशिदीजवळून जातांना वाद्ये वाजवल्यास मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात. काही ठिकाणी मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करून सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करतात. अनेक ठिकाणी मशिदी, मदरसे यांवर भोंगे लावून ध्वनीप्रदूषण करतात. हे सर्व अवडंबर धर्माच्या नावाखाली चालू आहे. याला कुणी विरोध केला, तर मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात. पोलीस आणि प्रशासन ‘धार्मिक भावना दुखावल्यास मुसलमान दंगल घडवतील’, या भीतीने कारवाई करण्यास कचरतात. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान केला जातो. हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी जर ‘डीजे’चा आवाज वाढला, तर पोलीस लगेच संबंधित गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करतात.

गळचेपी मात्र हिंदूंची !

दंगल होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी पोलीस आणि प्रशासन यांनी घ्यायलाच हवी. असे करतांना जे दंगलखोर आहेत त्यांना वचक बसेल, अशी त्यांची कारवाई हवी; मात्र असे करण्याऐवजी पोलीस हिंदूंची गळचेपी करतात. त्यामुळे धर्मांध मुसलमानांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, पोलीस आणि प्रशासन उद्दाम धर्मांधांसमोर नांगी टाकतात, तर निरपराध हिंदूंसमोर मर्दुमकी गाजवतात, हे चित्र आहे. ‘मुसलमान’ म्हटले की, राजकीय नेत्यांची भूमिकाही गुळमुळीत होते. मुसलमानांच्या या धर्मांधतेला भीक घालणे पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते थांबवतील, तेव्हा धार्मिक कारणामुळे होणार्‍या दंगलीही थांबतील.

धर्मांध मुसलमानांसमोर नांगी टाकणारे; मात्र हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?