भाव-भावना, त्रिगुण आणि सुख-दुःख, या सर्वांच्या पलीकडे असलेल्या अन् सतत ब्रह्मानंदात निमग्न असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या श्री चरणी कोटीशः नमन !
‘ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥
– गुरुगीता, श्लोक ८९
अर्थ : ब्रह्मानंदात निमग्न असणार्या, परमोच्च सुखाचे दाता, केवळ ज्ञानस्वरूप, सुखदुःखादी द्वंद्वरहित, आकाशाप्रमाणे (निराकार), ‘तत्त्वमसि’ आदी महावाक्याचे लक्ष्य (‘ते (ब्रह्म) तू आहेस’, असे वेदवाक्य ज्याला उद्देशून आहे, ते), एकच एक, नित्य, विमल (शुद्ध), निश्चल (स्थिर), सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भावातीत आणि त्रिगुणातीत असलेल्या सद्गुरूंना मी नमस्कार करतो.
भावार्थ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अवतारी गुरु असल्यामुळे ते मानवी देहरूपात असले, तरी सतत ब्रह्मानंदामध्ये निमग्न असतात. ते भाव-भावना, त्रिगुण, सुख-दुःख या सर्वांच्या पलीकडे आहेत. साधकांना ज्ञान आणि परमानंद दोन्ही प्राप्त करून देणारे ते महान गुरु आहेत. अशा महान अवतारी गुरूंच्या श्री चरणी कोटीशः नमनपूर्वक प्रार्थना करूया, ‘हे गुरुदेवा, आपल्या या परम आनंददायी तत्त्वाशी एकरूप होण्यासाठी आम्हाला सर्व द्वंद्वे, सर्व बंधने आणि सर्व दोष यांतून मुक्त करा. आम्ही आपल्या श्री चरणी संपूर्ण शरण आलो आहोत. आता आम्हाला बंधनमुक्त करून आपल्या श्री चरणी घ्या ! आपल्या श्री चरणी घ्या, कृपाळा !’- (समाप्त)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१४.५.२०२३)