सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

‘ईश्‍वराचा ‘निर्भयता’, हा गुण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात मुळातच आहे’, हे दर्शवणारे काही प्रसंग !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री. राम होनप

‘वर्ष १९९० पासून सनातन संस्था राष्ट्र आणि धर्म यांची सेवा निस्वार्थपणे, सातत्याने आणि सनदशीर मार्गाने करत आहे. हे कार्य करतांना विविध प्रसंगी सनातनवर पुढील संकटे आली, सनातनच्या साधकांना गुंडांकडून मारहाण होणे, गुंडांनी सनातनच्या अनेक आश्रमांवर आक्रमणे करणे, विविध प्रसंगी सनातनवर बंदीचे संकट येणे, तसेच अशा प्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांनी सनातनची अपकीर्ती अहोरात्र करणे इत्यादी. त्या काळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जागी अन्य कुणी असते, तर त्यांनी भीतीने सनातनचे कार्य बंद केले असते; परंतु ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे कठीण प्रसंगी डगमगले आहेत’, असे कधीच झाले नाही. ‘सनातनचे पुढे काय होणार ? साधकांचे काय होणार ?’, अशी चिंता किंवा काळजी परात्पर गुरु डॉक्टरांना करतांना मी कधीच पाहिले नाही किंवा इतरांकडून कधी ऐकले नाही. त्यांच्यात मुळातच ईश्‍वराचा ‘निर्भयता’, हा गुण आहे. हे त्यांचे अलौकिकत्व दर्शवते. परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनचा सर्वभार ईश्‍वरावर सोपवला आहे. त्यांच्या या श्रद्धेमुळे ‘सनातनची काळजी स्वतः ईश्‍वरच घेतो’, असे आतापर्यंत सर्व साधक अनुभवत आहे.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२३)