‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव होता. जन्मोत्सवाच्या दिवशी गुरुदेवांच्या छायाचित्राचे पूजन आणि आरती झाल्यावर त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतांना मला गुरुदेवांचे त्रिमूर्ती दत्तगुरूंच्या रूपात दर्शन झाले. त्या वेळी ‘मला पुढील गीताचे बोल स्फुरले आणि ते गुरुदेवांनीच शब्दरूप करवून घेतले’, याबद्दल त्यांच्या चरणी अनंत कोटीशः कृतज्ञता !
ब्रह्मरूप सौ. बिंदाई (टीप १), विष्णुरूप श्री जयंतजी (टीप २) ।
महेशरूप असती सौ. अंजलीताई (टीप ३) ।
वसती रामनाथी भूवैकुंठ भुवनी (टीप ४) ।
मला हे दिसती दत्तात्रय त्रिमूर्ती ।। १ ।।
सद्गुरु, संत उभे दूत म्हणूनी ।
साधकजन ते शरणागतीने रहाती आश्रयी ।
चारही वेदांसह गुरुकृपायोग पंचम वेद वदविती ।
मला हे दिसती दत्तात्रय त्रिमूर्ती ।। २ ।।
नजर शुभंकर फिरता तुमची ।
मंदिर बनले अवघे विश्वचि ।
घराघरांतून नामधारक साधकच दिसती ।
मला हे दिसती दत्तात्रय त्रिमूर्ती ।। ३ ।।
त्रिमूर्ती करती किमया सारी ।
कृतार्थ होते धरणी सारी ।
तुमचे हाती आमचे भवती हिंदु राष्ट्र दिसते ।
मला हे दिसती दत्तात्रय त्रिमूर्ती ।। ४ ।।
टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप ३ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
टीप ४ – रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम
(‘ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले । मला हे दत्तगुरु दिसले ।।’, या भक्तीगीताची चाल)
कृतज्ञतापूर्वक,
– श्री. दत्तात्रय बाळकृष्ण कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७८ वर्षे), सांगली. (२२.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |