पाक १९९ भारतीय मासेमारांची सुटका करण्याच्या सिद्धतेत !

इस्लामाबाद – सद्भावनेच्या दृष्टीकोनातून पाक सरकार १९९ भारतीय मसेमारांची १२ मे या दिवशी सुटका करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त आहे. सध्या हे सर्व आरोपी कराची येथील कारागृहात आहेत. तेथून त्यांना लाहोरला आणले जाईल आणि तेथून अटारी सीमेवरून भारतात पाठवले जाईल. पाकमधील संबंधित मंत्रालयाकडून या मासेमारांच्या सुटकेचा आदेश आला आहे, अशी माहिती कराचीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी काजी नजीर यांनी सांगितले.

पाकमध्ये नुकताच एका भारतीय बंदीवानाचा मृत्यू झाला आहे. पाकमधील कारागृहांत अटकेत असलेल्या ६५४ भारतीय बंदीवानांपैकी ६३१ जणांची शिक्षा पूर्ण झाली असून ते त्यांच्या सुटकेची वाट पहात आहेत.