समलैंगिकता हे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप !

श्री. चेतन राजहंस

समलैंगिक संबंध हे हिंदु धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाप आहे. आपल्या धर्मग्रंथांनुसार आपल्या मानवाचा विकास हा संस्कृतीच्या दिशेने झाला पाहिजे. तो विकृतीच्या दिशेने होऊन उपयोग नाही. आपल्याकडे लैंगिक संबंध विशेषतः संभोग हा केवळ प्रजोत्पत्ती या एकमेव उद्देशाने केला जातो. समलैंगिक संबंधात प्रजोत्पत्ती हा उद्देश नाही, तेथे केवळ भोगवाद आहे. आपली संस्कृती भोगवादाचे समर्थन करत नाही. न्यायदेवतेने जो काही निर्णय दिला आहे, तो आजच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून जरी असला, तरी ‘पाप केल्याने मृत्यूनंतर जीव दुर्गतीला जातो’, हे धर्मश्रद्ध समाजाने लक्षात घेतले पाहिजे. – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था. (७.९.२०१८)