तमिळ अभिनेत्री शालिनी यांनी रियाझ याच्याशी झालेल्या घटस्फोटानंतर छायाचित्रे फाडल्याचा व्हिडिओ केला प्रसारित !

नरकातून सुटल्याची अनेकांची प्रतिक्रिया !

तमिळ अभिनेत्री शालिनी

चेन्नई (तामिळनाडू) – तमिळ अभिनेत्री शालिनी यांचा रियाझ या मुसलमान व्यक्तीशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी दोघे एकत्र असलेली छायाचित्रे फाडत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यावरून सामाजिक माध्यमांतून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून काहींनी ‘शालिनी नरकातून सुटल्या’, असे म्हटले आहे.

दोघांचा विवाह वर्ष २०२० मध्ये झाला होता. त्यांना एक मुलगी असून विवाहाच्या वेळी शालिनी यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. रियाझने पत्नी शालिनी यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने त्यांनी घटस्फोट घेतला.