जबलपूर (मध्यप्रदेश) येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड  

काँग्रेस आणि बजरंग दल यांचा एकमेकांवर आरोप !

जबलपूर (मध्यप्रदेश) – कर्नाटकमध्ये काँग्रेसने निवडणुकीच्या घोषणापत्रात सत्तेवर आल्यावर बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. यास देशभरातून विरोध होत असतांना येथे बलदेव बाग जवळील काँग्रेसच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड बजरंग दलाकडून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे, तर बजरंग दलाने ही तोडफोड काँग्रेसनेच भगवे झेंडे घेऊन आमच्या नावाने केल्याचा प्रत्यारोप केला आहे. ‘या कार्यालयाबाहेर बजरंग दलाकडून निदर्शने करण्यात येतील’, असे पोलिसांना सांगण्यात आले होते. निदर्शनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवला होता. त्या वेळी ही तोडफोड झाली. (पोलीस बंदोबस्त असतांना तोडफोड होत असेल, तर असे पोलीस काय कामाचे ? अशांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)