परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याचे प्रक्षेपण पहातांना कु. सुनीता छत्तर यांना आलेल्या अनुभूती

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

१.परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरण पादुका प्रत्यक्षात हृदयमंदिरात असल्याचे अनुभवणे

‘१३.५.२०२० या दिवशी भावसोहळ्याच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणपादुकांची मानसपूजा सांगतांना ‘त्यांच्या चरणपादुका प्रत्यक्षात माझ्या हृदयमंदिरात आहेत आणि त्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने माझा अंतरात्मा शुद्ध, निर्मळ होत असून माझे संपूर्ण शरीर गुरुमय होत आहे’, असे मी अनुभवत होते.

सुश्री (कु.) सुनिता छत्तर

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणपादुकांच्या स्मरणाने चारही धामांचे फळ मिळून पापक्षालन होणे

‘ब्रह्मांडातील सर्व देवतांचा वास चरणपादुकांमध्ये आहे. त्यांच्या स्मरणमात्रे चारही धामांचे फळ मिळते आणि पापक्षालन होते’, हे ऐकून ‘प्रत्येक क्षणी चरणपादुकांप्रती भक्ती वाढावी’, यासाठी माझ्याकडून प्रयत्न होत असल्याचे मी अनुभवले.

३. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना मायेच्या सागरातून मुक्त करत असल्याचे जाणवणे

१५.५.२०२० या दिवशीच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी ‘चैतन्यमय सागरात आमचे समुद्रस्नान होत आहे. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला या चैतन्यसागरात स्नान करवून आम्हाला मायेच्या सागरातून मुक्त करत आहेत’, असे मला जाणवले.

४. ‘आमचा प्रत्येक श्वास परात्पर गुरु डॉक्टरांसाठी चालू आहे आणि गुरुसेवा हाच धर्म अन् कर्म आहे’, असे मला वाटले.

५. ‘माझ्या अंतर्मनात परात्पर गुरु डॉक्टरांचा ज्ञानदीप प्रज्वलित आहे आणि श्रीमन्नारायणाच्या रूपात ते माझ्या हृदयात स्थानापन्न झाले आहेत’, असे मला जाणवले.

‘आता मी गुरुबंधनात बांधले गेले आहे’, या भावाने माझ्या रोमारोमांतून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या अपार कृपेने सनातन संस्थेतील संतांच्या मार्गदर्शनातून सत्ययुगातील ऋषिमुनींचे दर्शन होऊ शकले आणि त्यांच्याप्रती माझी श्रद्धा आणखी अतूट झाली’, असे मला अनुभवता आले.’

– कु. सुनीता छत्तर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), वाराणसी

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक