३०.१०.२०२२ या दिवशी पू. पद्माकर होनप यांनी देहत्‍याग केल्‍यावर त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेत असतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्‍या अनुभूती

‘३०.१०.२०२२ या दिवशी दुपारी ४.२७ वाजता सनातनचे सातवे संत पू. पद्माकर होनप यांनी देहत्‍याग केला. तेव्‍हा त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत. २६.४.२०२३ या दिवशी यातील काही अनुभूती आपण पाहिल्‍या. आज उर्वरित अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/676956.html
पू. पद्माकर होनप

५ उ १. पू. होनपकाकांचे दर्शन घेणार्‍या श्री. अतुल बधाले या साधकाच्‍या देहाभोवती पू. काकांच्‍या देहातून प्रक्षेपित होणार्‍या पांढर्‍या धुरासारख्‍या लहरींनी साधारण ५ सें.मी. जाडीचे कवच निर्माण करणे : साधक श्री. अतुल बधाले हे पू. होनपकाकांच्‍या चरणांच्‍या समोर उभे राहून दर्शन घेत असतांना पू. काकांच्‍या चरणांच्‍या बोटांकडून प्रक्षेपित होणार्‍या धुरासारख्‍या लहरींची गती थोडी वाढली आणि त्‍या लहरी श्री. अतुल यांच्‍याकडे येऊ लागल्‍या. मला श्री. अतुल यांच्‍या संपूर्ण देहाभोवती त्‍या लहरींचे साधारण ५ सें.मी. जाडीचे कवच निर्माण झाल्‍याचे सूक्ष्मातून दिसले. ही प्रक्रिया झाल्‍यानंतर पू. काकांकडून श्री. अतुल यांच्‍याकडे येणार्‍या लहरी थांबल्‍या. हीच प्रक्रिया श्री. अतुल यांनी पू. काकांच्‍या देहाच्‍या बाजूने आणि डोक्‍याच्‍या समोरून दर्शन घेतांना घडली. श्री. अतुल यांनी पू. काकांच्‍या देहाच्‍या बाजूने उभे राहून त्‍यांना नमस्‍कार केल्‍यावर पू. काकांच्‍या संपूर्ण देहातून त्‍यांच्‍याकडे लहरी प्रक्षेपित झाल्‍या आणि श्री. अतुल यांनी पू. काकांच्‍या डोक्‍याच्‍या समोर उभे राहून त्‍यांना नमस्‍कार केल्‍यावर पू. काकांच्‍या डोक्‍याकडून लहरी प्रक्षेपित झाल्‍या.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

५ उ २. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या संदर्भात आलेल्‍या विविध अनुभूती

अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या पू. होनपकाकांचे त्‍यांच्‍या चरणांसमोर उभे राहून दर्शन घेत असतांना मला जाणवले, ‘पू. काकांच्‍या चरणांच्‍या बोटांतून प्रक्षेपित होणारा धुरासारख्‍या लहरींचा झोत वेगाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या छातीपर्यंत येत आहे.’

आ. त्‍या जेव्‍हा पू. काकांच्‍या देहाच्‍या बाजूला उभे राहून त्‍यांचे दर्शन घेत होत्‍या, तेव्‍हा पू. काकांच्‍या देहातून प्रक्षेपित होणार्‍या लहरी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या पावलांपासून मणिपूरचक्रापर्यंत येत होत्‍या.

इ. त्‍या जेव्‍हा पू. काकांच्‍या डोक्‍याच्‍या समोर उभे राहून दर्शन घेत होत्‍या, तेव्‍हा पू. काकांच्‍या डोक्‍यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या पावलांपासून डोक्‍यापर्यंत येत होत्‍या.

मला जसे जाणवले, तसेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाही जाणवले.

५ उ ३. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पू. होनपकाकांचे दर्शन घेत असतांना त्‍या दोघांकडून एकमेकांकडे त्‍यांची छाती ते पोट या भागाकडून प्रक्षेपित होणार्‍या पांढर्‍या धुरासारख्‍या लहरी एकमेकांमध्‍ये मिसळणे आणि तेव्‍हा ‘ते दोघे सूक्ष्मातून एकमेकांना भेटत आहेत’, असे जाणवणे : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जेव्‍हा पू. होनपकाकांच्‍या देहाच्‍या बाजूला उभे राहून त्‍यांचे दर्शन घेत होते, तेव्‍हा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची छाती ते पोट या भागाकडून धुरासारख्‍या लहरी पू. काकांच्‍या दिशेने प्रक्षेपित होऊ लागल्‍या आणि पू. काकांची छाती ते पोट या भागाकडूनही धुरासारख्‍या लहरी प्रक्षेपित होऊ लागल्‍या अन् त्‍या दोन्‍ही लहरी एकमेकांमध्‍ये मिसळत होत्‍या. तेव्‍हा मला वाटले, ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. काका एकमेकांना सूक्ष्मातून भेटत आहेत.’ यामध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याकडून प्रक्षेपित होणार्‍या धुरासारख्‍या लहरींचे प्रमाण अधिक होते.

पू. पद्माकर होनपकाका यांनी अशा विविध अनुभूती अनुभवण्‍यास दिल्‍या. यासाठी त्‍यांच्‍या चरणी आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मला या अनुभूती घेता आल्‍या, यासाठी त्‍यांच्‍याही चरणी माझे कोटी कोटी नमन !’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (३१.१०.२०२२)

(समाप्‍त)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक