परात्पर गुरुदेवांची कृपादृष्टी ।
पडली अवघ्या जिवांवरी ।।
चैतन्यात न्हाली अवघी सृष्टी ।
परात्पर गुरुदेव कृपे ।। १ ।।
अक्षय्य कृपेचे छत्र धरून ।
उद्धरी जिवा भवसागरातून ।।
नेऊनी ठेवी पावन चरणां ।
कृतज्ञ लक्ष्मीरमणा ।। २ ।।
चरणप्राप्तीचा अखंड ध्यास ।
राहो अविरत निज मनात ।।
समर्पित होवो प्रत्येक श्वास ।
क्षणोक्षणी गुरुस्मरणात ।। ३ ।।
प्रार्थितो या शुभदिनी ।
द्यावे अक्षय्यतेचे वरदान ।।
कदापी न पडो विसर ।
तुमच्या परम कृपेचा ।। ४।।
प्रार्थना एकच श्री गुरुचरणी ।
वास करावा मम अंतःकरणी ।।
मुक्त करावे भवबंधातून ।
देऊनी चरणी ध्रुवासम स्थान ।। ५ ।।
– डॉ. श्रीपाद व्यंकटेश पेठकर (वय ६१ वर्षे), पंढरपूर (३.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |