प्रार्थना एकच करते शरणागतीने, गुरुचरणी रहाण्‍यासाठी ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

अवतार घेतला गुरुदेवांनी (टीप १)
आमुच्‍या उद्धारासाठी ।
देह झिजवला तुम्‍ही
साधकांच्‍या कल्‍याणासाठी ॥

ध्‍यास घेतला तुम्‍ही
साधकांच्‍या प्रगतीचा ।
प्रार्थना एकच करते शरणागतीने, गुरुचरणी रहाण्‍यासाठी ॥ १ ॥

मोक्षगुरु असूनही शिष्‍य म्‍हणवता स्‍वतःला,
आम्‍हाला शिकवण्‍यासाठी ।
सत्‍सेवा देता तुम्‍ही, आमच्‍या सर्वस्‍वाचा त्‍याग होण्‍यासाठी ॥

सदा प्रयत्नरत असता तुम्‍ही, आम्‍हाला आनंद मिळण्‍यासाठी ।
प्रार्थना एकच करते शरणागतीने, गुरुचरणी रहाण्‍यासाठी ॥ २ ॥

अनेकविध प्रयत्न करता तुम्‍ही, मानवजातीच्‍या कल्‍याणासाठी ।
नामजपादी उपाय करता तुम्‍ही,
साधक जिवंत (टीप २) रहाण्‍यासाठी ॥

जयंतावतार घेतला तुम्‍ही, हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होण्‍यासाठी ।
प्रार्थना एकच करते शरणागतीने, गुरुचरणी रहाण्‍यासाठी ॥ ३ ॥

गुरुदेवा, करता कृपा तुम्‍ही, आम्‍हाला आनंद देण्‍यासाठी ।
सर्वस्‍वाचा त्‍याग केला आहे तुम्‍ही,
आम्‍हाला मोक्षाला नेण्‍यासाठी ॥

स्‍वीकारावी आमुची कृतज्ञतापुष्‍पे तुम्‍ही,
आमच्‍यावर केलेल्‍या ऋणांसाठी ।
प्रार्थना एकच करते शरणागतीने, गुरुचरणी रहाण्‍यासाठी ॥ ४ ॥

टीप १ – परात्‍पर गुरु डॉ. आठवले

टीप २ – अनिष्‍ट शक्‍तींच्‍या त्रासांपासून साधकांचे रक्षण होण्‍यासाठी

– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.३.२०२२)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक