नांदेड येथील माजी आमदार अनुसया खेडकर यांच्‍यासह शिवसैनिकांचा जामीन संमत !

माजी आमदार अनुसया खेडकर

नांदेड – येथील हिंगोली प्रवेशद्वार येथे वर्ष २००८ मध्‍ये महागाईच्‍या विरोधात आंदोलन केल्‍याप्रकरणी झालेल्‍या सरकारी मालमत्तेच्‍या हानीस दोषी धरून येथील जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश शशिकांत बांगर यांनी तत्‍कालीन शिवसेना आमदार अनुसया खेडकर यांच्‍यासह १९ शिवसैनिकांना ५ वर्ष सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपिठात अपील प्रविष्‍ट करण्‍यात आले असून न्‍यायमूर्ती आर्.जी.अवचट यांनी माजी आमदार खेडकर आणि इतर आंदोलक यांचे जामीन १८ एप्रिल या दिवशी संमत केले आहेत.

वर्ष २००८ मध्‍ये राज्‍यात काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतांना महागाईच्‍या विरोधात हे आंदोलन करण्‍यात आले होते. यात आंदोलक आमदार खेडकर आणि अन्‍य जवळपास १५० जणांना पोलिसांनी कह्यात घेतले होते, तर एस्.टी. चालकाच्‍या तक्रारीवरून एस्.टी. बसगाड्या, महापालिका आणि पोलीस वाहनांची हानी अन् सरकारी कामात अडथळा निर्माण केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. यात १९ जणांना अटक करण्‍यात आली होती. न्‍यायालयात दोषारोपपत्र प्रविष्‍ट झाल्‍यानंतर सरकारच्‍या वतीने एकूण ११ साक्षीदार पडताळण्‍यात आले.