देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. राजेंद्र सांभारे

१. यज्ञाचा आरंभ शंखनाद करून झाला. त्या वेळी माझ्यावर आध्यात्मिक स्तरावर उपाय झाले, असे मला जाणवले.

२. दक्षिणामूर्ति ही देवता भगवान शिवाचे रूप आहे. यज्ञाच्या वेळी अग्नीदेव दक्षिणामूर्ति देवाला शरण गेला, असे मला जाणवले.

३. यज्ञकुंडात समिधा अर्पण झाल्यावर निर्माण झालेल्या ज्वाळा शरणागतभावाने तांडव नृत्य करत होत्या, असे मला जाणवले.

४. मला काही अग्नीच्या ज्वाळांमध्ये ॐ दिसला.

– श्री. राजेंद्र नारायण सांभारे (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक