हिमालयातील वनौषधी आणि अन्य खनिजे यांमधून वहाणार्या गंगेत दिव्य आणि दुर्लभ गुण आहेत, हे वैज्ञानिकदृष्ट्याही फार पूर्वीच सिद्ध झाले आहे. या संदर्भात अनेक पुरावेही मिळाले आहेत. इंग्लंडचा राजा एडवर्ड (सातवा) याच्या राज्याभिषेक सोहळ्याला जातांना जयपूरचे राजे सवाई माधोसिंह (द्वितीय) चांदीच्या घागरीत गंगेचे ६१५ लिटर पाणी घेऊन गेले होते. त्या घागरी राजा एडवर्ड याच्या मृत्यूनंतर वर्ष १९२२ मध्ये राजप्रासादात ठेवण्यात आल्या होत्या. वर्ष १९६२ मध्ये त्यावरील आच्छादन काढण्यात आले. तेव्हाही गंगाजल आधीप्रमाणेच स्वच्छ आणि शुद्ध होते. वर्ष १८८३ मध्ये हरिद्वार येथे गंगाजलाचे परीक्षण करणार्या ‘युनेस्को’च्या (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या) वैज्ञानिकांनाही प्रत्यक्ष हे लक्षात आले की, गंगेत मृतदेह, हाडे इत्यादी प्रदूषित करणारे घटक वाहूनही काही फुटांखालील पाणी पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते.
(गंगा नदीवर टीका करणारे आणि तिच्या पवित्रतेविषयी शंका उपस्थित करणारे याविषयी काही बोलतील का ? – संपादक)
(साभार : मासिक ‘गणानाम् त्वां’, जुलै २०१४)