‘९.५.२०२१ या दिवशीच्या ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) संदर्भात लिखाण आले होते. तेव्हा ‘सनातन प्रभात’च्या त्या अंकासमोर बसून दिवसातून २ – ३ वेळा आत्मनिवेदन करायचे’, असा विचार गुरुमाऊलींनी मला सूक्ष्मातून दिला. मी तसे प्रयत्न चालू केल्यानंतर माझी स्वतःला पालटण्याची तळमळ वाढली. गुरुमाऊली ‘कृतीच्या स्तरावरील प्रयत्न माझ्या अंतरातून करून घेत आहेत’, असे मला जाणवले. इतके दिवस माझ्याकडून कृतज्ञता वरवर व्यक्त व्हायची. मी दैनिकासमोर आत्मनिवेदन करायला चालू केल्यानंतर माझ्या अंतर्मनातून कृतज्ञता व्यक्त होऊ लागली. माझी भावजागृती होऊन मला आनंद मिळू लागला. आता मला माझे यजमान श्री. शिरीश सारडा यांच्या विषयीही आतूनच कृतज्ञता वाटते, तसेच ‘ज्या परस्थितीत देवाने मला ठेवले आहे’, त्याविषयीही कृतज्ञता वाटते.
आता जेव्हा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते, तेव्हा मला आनंद वाटतो. देवाने कृतज्ञतेच्या माध्यमातून माझ्या आनंदात वाढ केली आहे. त्यासाठी मी देवाचरणी कृतज्ञता व्यक्त करते. तेव्हापासून ‘देवाशी २४ घंटे अनुसंधान असल्यास किती आनंद अनुभवायला मिळेल !’, असे मला वाटत आहे. ‘गुरुमाऊली, मला या स्थितीत घेऊन जा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. निशा शिरीष सारडा, विश्रामबाग केंद्र, सांगली. (१५.६.२०२१)
|