विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची यांचे विधान
बरेली (उत्तरप्रदेश) – मुसलमान बहिणी आणि मुली यांनी हिंदु मुलांशी विवाह केल्यास त्यांना ते लाभदायी ठरेल. त्या आनंदी जीवन जगू शकतील. त्यांना काळ्या कपड्यांत रहावे लागणार नाही, तसेच त्यांना तिहेरी तलाक आणि हलाला यांना सामोरे जावे लागणार नाही, असे विधान विश्व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी येथे केले.
भारतात रहाणार्या लोकांची ‘डी.एन्.ए.’ (व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी केली, तर प्रत्येकाचे पूर्वज प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण आणि बाबा भोलेनाथ असल्याचे लक्षात येईल, असेही त्या म्हणाल्या.
बरेली में साध्वी प्राची का विवादित बयान
‘मुस्लिम बहनें हिंदू लड़कों से शादी करें’
‘तीन तलाक, बुर्का, हलाला से बचेंगी मुस्लिम बहनें’
‘हिंदू लड़कों से शादी करने पर स्वर्ग जैसी जिंदगी होगी’@Sadhvi_prachi @VHPDigital pic.twitter.com/gE0IyNLLEP— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) April 6, 2023
श्रीरामनवमीच्या दिवशी बिहार आणि बंगाल येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना साध्वी प्राची म्हणाल्या की, ममता बॅनर्जी मुसलमानांच्या केल्या तुष्टीकरणाला प्रोत्साहन देत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘इफ्तार पार्ट्यां’मध्ये दंग आहेत. बिहार आणि बंगाल राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे.