यासीन भटकळ सुरतमधील मुसलमान वस्त्या रिकाम्या करून शहरावर अणूबाँब टाकणार होता !

एन्.आय.ए.ने न्यायालयात दिली माहिती

आतंकवादी यासीन भटकळ

नवी देहली –गुजरातमधील सुरत शहरातील सर्व मुसलमान वस्त्या रिकाम्या करून तेथे केवळ मुसलमानेतर नागरिक राहिल्यानंतर शहरावर अणूबाँब टाकण्याचा इंडियन मुजाहिदीनचा आतंकवादी यासीन भटकळ याचा कट होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यातून हे स्पष्ट होते, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे.

या संघटनेचा प्रमुख आतंकवादी यासीन भटकळ याच्यासह अन्य ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. सुनावणीनंतर ‘यासीन भटकळ याच्या विरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.