बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजपवाल्यांना प्रश्न !
कोलकाता (बंगाल) – मला प्रत्येक क्षणाला सतर्क रहावे लागते. भाजपवाले कुठेही दंगल घडवू शकतात. भगवान श्रीरामाने मिरवणुकांमध्ये शस्त्रे नेण्यास सांगितले होते का ?, असा फुकाचा प्रश्न बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना भाजपवाल्यांना केला. राज्यात रामनवमीनिमित्त विविध ठिकाणी भाजप आणि हिंदु संघटना यांच्याकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर झालेल्या आक्रमणाच्या संदर्भात त्या बोलत होत्या. (राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या ममता बॅनर्जी यांचे सरकार विसर्जित करणेच आता योग्य आहे, हेच या विधानातून स्पष्ट होते ! – संपादक)
‘मुझे हर वक्त रहना पड़ता है अलर्ट, कब करा दें ये लोग दंगा’, बंगाल हिंसा पर ममता का BJP पर पलटवार
#Bengal #MamataBanerjee #BengalViolence #TMChttps://t.co/HspVSQ9kVl— Dainik Jagran (@JagranNews) April 4, 2023
१. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही एक हिंसा आहे. आम्ही हिंसा करत नाही. बंगालच्या नागरिकांना हिंसा आवडत नाही. त्यांनी (भाजपवाल्यांनी) बंगालमध्ये बाहेरून गुंड आणले होते, असा आरोपही त्यांनी केला.
२. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी यापूर्वी आरोप केला होता, ‘ममता बॅनर्जी सर्वांच्या नाहीत, तर एका धर्माच्या मुख्यमंत्री आहेत.’ मजूमदार यांनी हुगळीच्या श्रीरामपूर येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते; मात्र प्रशासनाने ते करू दिले नाही.
संपादकीय भूमिका
|