बीड येथे नशेच्‍या औषधांचा साठा जप्‍त !

दोघांवर गुन्‍हा नोंद, तर १ धर्मांध पोलिसांच्‍या कह्यात

(प्रतिकात्मक छायायाचित्र)

बीड – नशेच्‍या गोळ्‍या, तसेच खोकल्‍याचे औषध घेऊन नशा करणार्‍या किशोरवयीन तरुणांची संख्‍या शहरात वाढत आहे. यातून काही दिवसांपूर्वी एकाची हत्‍या, तर अत्‍याचाराची घटना घडली आहे. पोलिसांच्‍या पथकाने औषधांचा साठा जप्‍त केला. या प्रकरणी दोघांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद झाला आहे. यासंदर्भात पेठबीड पोलीस ठाण्‍याच्‍या परिसरातील कंकालेश्‍वर मंदिर परिसरात पोलिसांनी धाड टाकली आहे. या वेळी आरोपी शेख फैजाज शेख मकसूद याला पकडून त्‍याच्‍याकडून ‘कोडेन फॉस्‍फेट क्‍लोरफेनिरामाइन मॅलेट सिरप’ या औषधाच्‍या नशेसाठी वापरण्‍यात येणार्‍या ३५३ रुपये किमतीच्‍या ११ बाटल्‍या जप्‍त केल्‍या. (नशेसाठी तरुणांना उद्युक्‍त करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होण्‍यासह याची पाळेमुळे कुठपर्यंत पोचली आहेत, याचीही पडताळणी होणे आवश्‍यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

प्रत्‍येक गुन्‍ह्यामध्‍ये धर्मांध असतात, हे लक्षात घ्‍या !