यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या योजनेतील भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणी अभियंत्‍याला अटक

भ्रष्‍टाचाराची बजबजपुरी झालेला महाराष्‍ट्र !

प्रतिकात्मक छायाचित्र

यवतमाळ – शहराला पाणीपुरवठा करणार्‍या अमृत योजनेंतर्गत ‘३३ केव्‍ही’चे एक्‍सप्रेस फिडर बसवण्‍याच्‍या वीज वितरणने केलेल्‍या कामात अनियमितता झाल्‍याचा ठपका न्‍यायालयाच्‍या आदेशावरून ठेवण्‍यात आला होता. या प्रकरणाशी थेट संबंध असलेले येथील तत्‍कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे यांना आर्थिक गुन्‍हे शाखेने २८ मार्च या दिवशी अटक केली. पात्रता नसणार्‍या कंत्राटदारांना काम देण्‍यात आल्‍याचा ठपका ठेवण्‍यात आला होता. हे एकूण काम ६ कोटी ५४ लाख रुपयांचे होते. या संदर्भात विधीमंडळातही चर्चा झाली होती.

या प्रकरणात कंत्राटदार आणि वीज वितरणचे अभियंते यांच्‍यावर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत. अजिंक्‍य पाटील यांनी माहिती अधिकारातून याविषयीची माहिती काढली होती. आरोपी चितळे हे सध्‍या हिंगोली येथे कार्यरत होते. तेथे दोन उपविभागांचा प्रभार त्‍यांच्‍याकडे होता.