वसंतदादा साखर कारखाना परिसरातील अवैध प्रार्थनास्थळाचे बांधकाम तात्काळ हटवावे ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगलीत ‘लँड जिहाद’चा वाढता विळखा !

पत्रकार परिषदेत माहिती देतांना श्री. नितीन शिंदे आणि अन्य मान्यवर

सांगली – वसंतदादा साखर कारखाना परिसरातील लक्ष्मीनगर येथील दडगे प्लॉट येथे एक गुंठा जागेवर अवैधरित्या प्रार्थनास्थळाचे बांधकाम करण्याचा प्रयत्न मुसलमानांकडून चालू आहे. वास्तविक या भूमीवर रस्त्याचे आरक्षण आहे. ही गोष्ट महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर नोटीस देण्यात आली; मात्र प्रार्थनास्थळाचे बांधकाम चालू आहे. तरी प्रशासनाने अवैध बांधकाम तात्काळ हटवावे; अन्यथा सकल हिंदु समाजाच्या वतीने आम्हाला ते हटवावे लागेल, अशी चेतावणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी २५ मार्च या दिवशी पत्रकार परिषेदत दिली. या प्रसंगी सर्वश्री अविनाश मोहिते, अभिमन्यू भोसले, आकाश जाधव, प्रकाश निकम, भूषण गुरव, संजय जाधव, बाळासाहेब बेलवलकर, रवींद्र वादवणे, राकेश कलगुडगी, किरण बेलवलकर, आशिष साळुंके, शुभम खोत आदींसह सांगलीचे सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘या परिसरात ३ सहस्र ५०० हिंदूंची घरे आहेत, तर केवळ ५ मुसलमान असतांनाही प्रार्थनास्थळ उभारण्याचा घाट घातला जात आहे. अवैध बांधकाम करणारे पोलीस प्रशासनासही घाबरत नाहीत अशी स्थिती आहे. ‘महापालिका क्षेत्रात कुठेही अवैध बांधकाम आमच्या निदर्शनास आणून द्यावे त्यावर आम्ही तात्काळ कारवाई करू’, असे घोषित केले आहे. ’’

सांगली महापालिका क्षेत्रात अन्य ठिकाणीही अशा प्रकारे धर्मांधांकडून हिंदूंच्या जागा, मंदिरे यांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याकडेही महापालिका प्रशासनाने लक्ष घालणे आणि तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे, असे आवाहन श्री. नितीन शिंदे यांनी या प्रसंगी केले.