स्वतःच्या शारीरिक त्रासाच्या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

सौ. स्वेता सुशांत नाईक

१. शारीरिक त्रासाच्या निवारणासाठी एका ज्योतिषांनी विधी करण्यास सांगितल्यावर साधिकेने नातेवाइकांना विधी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगणे : मला वर्षभर अधूनमधून सतत सर्दी होत असते आणि त्यामुळे मला पुष्कळ त्रास होतो. माझा हा त्रास दूर व्हावा, यासाठी आमच्या एका नातेवाईकाने माझी जन्मपत्रिका एका ज्योतिषांना दाखवली. त्या ज्योतिषांनी माझ्या त्रासाचे निवारण होण्यासाठी एक विधी आणि त्यासाठी काही सहस्र रुपये व्यय (खर्च) येईल, असे सांगितले. त्या नातेवाईकाने हे मला सांगितल्यावर मी त्यांना म्हणालेे, मला होणार्‍या त्रासाच्या निवारणासाठी विधी करण्याची आवश्यकता नाही.

२. प्रारब्ध भोगूनच संपवायचे असल्याने विधी करण्यासाठी लागणारे पैसे धर्मकार्यासाठी अर्पण करणे योग्य ! : व्यष्टी साधनेचा आढावा देतांना मी हा प्रसंग सांगितला. तेव्हा आढावासेवकांनी मला विचारले, नातेवाईकांना असे सांगण्यामागे तुमच्या मनात कोणता विचार होता ? त्या वेळी देवाने मला उत्तर सुचवले, आपल्या जीवनात जे काही घडते, ते प्रारब्धानुसार घडत असते आणि ते भोगूनच संपवायचे आहे. त्यामुळे प्रारब्ध सहन करण्यासाठी प.पू. गुरुदेवांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) शक्ती मागणे आवश्यक आहे. विधी करण्यासाठी लागणारे पैसे धर्मकार्यासाठी अर्पण केल्यास त्याचा अधिक लाभ होईल, असे मला वाटले. (काही वैशिष्ट्यपूर्ण विधी करायचे कि नाही ? हे केवळ उन्नतच सांगू शकतात. – संकलक)

–     सौ. स्वेता सुशांत नाईक (सनातनच्या ६२ व्या संत पू. सुमन नाईक यांची मुलगी), फातोर्डा, मडगाव. (२९.८.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक