पृथ्वीच्या जवळून जाणार आहे एक विशाल लघुग्रह ! – नासा

वॉशिंग्टन – अवकाशात पृथ्वीच्या जवळून एक विशाल लघुग्रह जाणार असल्याची माहिती अमेरिकेच्या नासाने दिला आहे. ‘२०२३ डीझेड२’ असे या लघुग्रहाचे नाव असून तो १३० बाय ३०० आकाराचा आहे. त्याची उंची ७३ मीटर (२३९.५ फूट) इतकी आहे. हा लघुग्रह चंद्राच्या कक्षेपासून ५ लाख १५ सहस्र किमी अंतरावरून जाणार आहे.

एवढ्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणे, ही फार दुर्मिळ घटना आहे. अशा प्रकारच्या खगोलीय घटना दशकातून एकदाच घडतात, असे नासाने म्हटले आहे. या लघुग्रहापासून पृथ्वीला कुठलाही धोका नसल्याचेही नासाने स्पष्ट केले.