मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना मध्येच ‘ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांनी २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा सणानिमित्त शहरात फेरी निघते, त्या वेळी कोरोनाच्या दृष्टीने लोकांना काही त्रास होणार नाही का ?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला. राणे म्हणाले की, केवळ हिंदूंचे सण आल्यावरच इतरांना कोरोनाची आठवण कशी होते ? इतर वेळी ही आठवण का होत नाही. ‘कामकाजातून सुनील प्रभु यांचे सूत्र काढून टाकावे’, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
या वेळी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विधानसभेत अन्य विषयावर चर्चा चालू असतांना मध्येच औचित्याचे सूत्र मांडले जाते, हे अयोग्य आहे.