‘मास्क घालावा कि नाही ?’ – शासनाची भूमिका २३ मार्चला विधीमंडळात स्पष्ट होणार !

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – ‘इन्फल्युएंझा’ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन मास्क घालावा कि नाही, याविषयी शासनाची भूमिका काय आहे ? ‘महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी ‘आता मास्क घालण्याची वेळ आली आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मास्क घालायचा कि नाही ? घालायचा झाल्यास सर्वांनी घालावा का ? याविषयी शासनाने २३ मार्च या दिवशी सभागृहात निवेदन करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना दिले.