४ मासांनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या झाली ७०० हून अधिक !

नवी देहली – देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ७५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या ४ मासांनंतर ७०० हून अधिक रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे.

सध्या देशात ४ सहस्र ६२३ कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख ३० सहस्र ७९० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.