अमेठी येथील सरकारी शाळेचा मुख्याध्यापक अनीस अहमद याने केला मुलीवर बलात्कार !

अमेठी (उत्तरप्रदेश) – येथील एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापक अनीस अहमद याने शाळेत एका मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून अनीस अहमद फरार आहे.

एका वृत्तानुसार, पीडित मुलगी १३ मार्च २०२३ या दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शाळेतील हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती. शाळेतून बादलीत पाणी भरून परत जात असतांना अनीसने तिला पाणी घेण्याच्या बहाण्याने त्याच्या कक्षात बोलावले. त्या वेळी अनीस शाळेत एकटाच होता. मुलगी येताच त्याने तिचे तोंड कापडाने बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीला घरी पाठवून याविषयी कुणाला सांगितल्यास तिच्या कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शिक्षण विभागाने मुख्याध्यापक अनीसला निलंबित केले आहे.

संपादकीय भूमिका

असे नीतीमत्ताहीन शिक्षक शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होत ! अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने द्यायला हवी !